Sericulture : रेशीम कोष उत्पादनात गतवर्षीच्या तुलनेत २८ टनांनी वाढ

Silk Cocoon Production : परभणी-हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी यंदा २२८ टन रेशीम कोष उत्पादन घेतले आहे.
Sericulture
Sericulture Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी-हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी यंदा २२८ टन रेशीम कोष उत्पादन घेतले आहे. त्यात परभणीतील १६७ टन आणि हिंगोली जिल्ह्यातील ६१ टन रेशीम कोष उत्पादनाचा समावेश आहे. गतवर्षीच्या तुलनेत या दोन जिल्ह्यांतील रेशीम कोष उत्पादनात २८ टनांनी वाढ झाली आहे.

परभणी जिल्ह्यातील जुनी ४७० एकर व नवीन ११५ एकर मिळून एकूण ५८५ एकरांवर तुती लागवड केलेली आहे. त्यापैकी जुन्या ४१० शेतकऱ्यांना ४३५ एकरांसाठी व नवीन १०९ शेतकऱ्यांना १०९ एकरांसाठी मिळून एकूण ५१९ शेतकऱ्यांनी ५४४ एकर तुतीवर रेशीम कोष उत्पादन घेतले.

Sericulture
Sericulture : रेशीम कोश उत्पादकांची कसरत सुरू

या शेतकऱ्यांना मागील वर्षभरात ३ लाख ५ हजार अंडीपुंजाचा पुरवठा करण्यात आला. जुन्या व नवीन तुती लागवडीपासून १३८.७५० टन कोष उत्पादनाचे उद्दिष्ट होते. परंतु प्रत्यक्षात १६७.२१ टन रेशीम कोष उत्पादन मिळाल्याने उद्दिष्टाची १२० टक्के पुर्तता झाली आहे. २०२२-२३ मधील १४७ टन कोष उत्पादनाच्या तुलनेत २०.२१ टनांनी वाढ झाली, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी गोविंद कदम यांनी दिली.

Sericulture
Sericulture : दोन हजारांवर गावांत रेशीम शेतीचा विस्तार

हिंगोली जिल्ह्यात १७२ शेतकऱ्यांकडे १७७ एकरांवर जुनी तुती लागवड तर ९७ शेतकऱ्यांकडे ९७ एकर नवी अशी मिळून २६९ शेतकऱ्यांकडे २७४ एकर तुती लागवड आहे. एकूण १ लाख १२ हजार ९५० अंडीपुंजांपासून ६१.१६३ टन कोष उत्पादन घेण्यात आले. २०२२-२३ मध्ये १ लाख ४ हजार २०० अंडीपुंजांपासून ५३ टन कोष उत्पादन घेण्यात आले होते. त्या तुलनेत उत्पादनात ८ टनांनी वाढ झाली, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी प्रमोद देशपांडे यांनी दिली.

तुलनात्मक रेशीम कोष उत्पादन (टन)

जिल्हा...२०२१-२२...२०२२-२३...२०२३-२४

परभणी...१२१...१४७...१६७

हिंगोली...३०...५३...६१

दुष्काळी स्थितीमुळे तुती लागवड क्षेत्र कमी झाले. परंतु गतवर्षीच्या तुलनेत कोष उत्पादकता वाढली. अनेक भागात सिंचनासाठी पाणी नाही. तुती जिवंत ठेवण्याचे आव्हान आहे.
- गोविंद कदम, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, परभणी.
यंदा महारेशीम अभियानात हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ३५० एकवर तुती लागवडीसाठी नोंदणी केली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोष उत्पादनात वाढ झाली आहे.
- प्रमोद देशपांडे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, हिंगोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com