Shaktipeeth Highway : पूर्वसूचना न देता शक्तिपीठ महामार्गाचे सर्वेक्षण, शेतकऱ्यांनी काम पाडलं बंद

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या पथकाला शेतकऱ्यांनी माघारी धाडले.
Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highwayagrowon
Published on
Updated on

Govt Survey Shaktipeeth Highway : महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांना जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाचे सरकारकडून सर्वेक्षण सुरू आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील १२५ किलोमीटर पेक्षाही जास्त अंतरावरून हा महामार्ग जाणार आहे. यामध्ये १ हजार २०० हेक्टर शेतजमीन हस्तातरीत करण्याचे काम शासनाकडून करण्यात येणार आहे.

परंतु याला कोल्हापूर जिल्ह्यासह अनेक शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. जिल्ह्यातील आजरा तालुक्यात या मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. याला शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला आहे.

शक्तिपीठ महामार्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या पथकाला शेतकऱ्यांनी माघारी धाडले. महामार्ग बाधितांना कोणतीही पूर्वसूचना न देता आजरा तालुक्यातील खेडगे, पारपोली, सुळेरान, शेळप येथे शक्तिपीठ महामार्गचे काल (दि.२२) पथक आले होते. कोणतीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांचा विरोध लक्षात न घेता सरकार बळजबरीने सर्वेक्षण करू पाहत आहेत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला.

आजरा तालुक्यातील खेडगे, पारपोली, सुळेरान, शेळप येथे शक्तिपीठ महामार्गचे पथक आले होते. पथकाकडून महामार्गाचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू होते. याला शेतकऱ्यांनी विरोध केला. गेले कित्येक दिवस या महामार्गला शेतकऱ्यांमधून विरोध होत आहे.

Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाविरोधात जनहित याचिका होणार दाखल, कोल्हापुरकरांचा तीव्र विरोध

आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले आहे. शेतकरी निवेदने, मेळावे, परिषद सभा घेऊन आपला विरोध दर्शवत आहेत, पण या विरोधाला सकारात्मक प्रतिसाद न देता, त्यांचा विरोध लक्षात न घेता सरकार बळजबरीने सर्वेक्षण करू पाहत असल्याचा आरोप केला. खेडगे (ता. आजरा) येथे प्रियांका शेटगे, धोंडिबा सावंत, प्रकाश कविटकर, धाकू कविटकर, अनिल अमुनेकर यांच्या पुढाकाराने शेतकरी एकत्र आले होते.

वाघापूर येथे २५ ला मेळावा

शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधासाठी गुरुवारी (ता. २५) वाघापूर (ता. भुदरगड) येथे मेळावा होणार आहे. संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा होणार असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात एकत्रित येण्याचा निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com