Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : शेतकऱ्यांनी स्वखर्चाने साकारली उपसा योजना

Farmer Self Funded Irrigation : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळी गाव म्हणून ओळख असलेल्या धामणी येथील साठ शेतकऱ्यांनी एकत्र येत कोणत्याही शासकीय मदतीची वाट न पाहता सुमारे सव्वा कोटी रुपये खर्चाची ‘सागदरा उपसा सिंचन’ योजना सुरू करून जिरायती भागात जलक्रांती घडवून आणली आहे.

Team Agrowon

Pune News : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळी गाव म्हणून ओळख असलेल्या धामणी येथील साठ शेतकऱ्यांनी एकत्र येत कोणत्याही शासकीय मदतीची वाट न पाहता सुमारे सव्वा कोटी रुपये खर्चाची ‘सागदरा उपसा सिंचन’ योजना सुरू करून जिरायती भागात जलक्रांती घडवून आणली आहे.

धामणी हे दुष्काळी गाव म्हणून ओळखले जाते. या परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे येथे दरवर्षी दुष्काळ ठरलेला असतो. म्हाळसाकांत जलसिंचन योजना लोणी धामणी परिसरातील गावांना वरदान ठरणारी आहे. मात्र, गेली २० वर्षांपासून निवडणुका आल्या की त्यावर चर्चा होती. त्यानंतर तो विषय पुन्हा मागे पडतो.

धामणी हे दुष्काळी गाव म्हणून ओळखले जाते. या परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे येथे दरवर्षी दुष्काळ ठरलेला असतो. म्हाळसाकांत जलसिंचन योजना लोणी धामणी परिसरातील गावांना वरदान ठरणारी आहे. मात्र, गेली २० वर्षांपासून निवडणुका आल्या की त्यावर चर्चा होती. त्यानंतर तो विषय पुन्हा मागे पडतो.

अनेकदा या योजनेचे वेगवेगळ्या ठिकाणावरून सर्व्हेक्षण झाले आहे. योजना कधी पूर्णत्वास येईल, याचा भरवसा नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकरी एकत्र आले. ते स्वखर्चाने आठ किलोमीटर अंतरावरील डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाइप लाईन करून पाणी आणत आहे.

येथील चाडदरा येथील तब्बल साठ कुटुंबांनी एकत्र येत सागदरा उपसा सिंचन योजना या नावाने संस्था स्थापन करून त्या माध्यमातून कुठलीही सरकारी आर्थिक मदत न घेता अंदाजे सव्वा कोटी रक्कम खर्च करून ही योजना पूर्णत्वास नेली आहे. त्यामध्ये चाडदरा येथील योजनेत सहभागी असलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांचा खारीचा वाटा आहे.

या सर्व शेतकऱ्यांसाठी बुधवार (ता. २५) हा दिवस स्मरणात राहणारा ठरला. या दिवशी पाणी शेवटच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर झालेला ‘सदानंदाचा येळकोट’चा जयघोष केलेल्या कष्टाला फळ आल्याची साक्ष देत होता. योजनेत सहभाग १०० सभासद शेतकऱ्यांनी आपल्या सातबारा उताऱ्यावर जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज काढून ही योजना पूर्णत्वास नेली आहे.

तसेच, दुय्यम निबंधक, पाटबंधारे विभाग, महावितरण या शासकीय यंत्रणेबरोबर, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना व पुणे जिल्हा सहकारी बँक यांनी देखील ही योजना पूर्ण करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे या परिसरातील बहुतांशी परिसर बागायती होणार आहेत. त्याचा आनंद शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी ही जलक्रांती केली असून, त्यांच्या या क्रांतिकारी कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

सागदरा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून आणलेली पाणी हे येथील धनगरदरा पाझर तलावात सोडण्यात येणार आहे. त्याचा फायदा तलावाच्या खालच्या भागात असलेल्यास २५ ते ३० विहिरीच्या नैसर्गिकरित्या पाणी पातळी वाढण्यास होणार आहे.
सोमनाथ जाधव, संस्थापक, सागदरा उपसा सिंचन योजना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain: विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर कमीच राहणार

Manmad APMC : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तांतराच्या हालचाली

Humani Pest Outbreak : मानोरा तालुक्यात हुमणी अळीचा प्रकोप

Farmer Loan Waiver : व्याजमाफी करून मुदलाचे हप्ते करून द्या

Agriculture Solar Pump : सोलरही नाही अन् पैसेही परत मिळेना

SCROLL FOR NEXT