Solar Power System : राज्यातील सर्व उपसा सिंचन योजना सौर ऊर्जाकरणावर

Devendra Fadanvis : राज्यातील २४२ शासकीय आणि सहकारी उपसा जलसिंचन योजना यापुढे सौर ऊर्जाकरणावर सुरू करणार आहोत, त्यामुळे उपसा योजनाची भरमसाट बिले यापुढे येणार नाहीतच, पण शेतकऱ्यांनाही विनाव्यत्यय या योजनांचे पाणी मिळण्यास मदत होणार आहे.
Devendra Fadanvis and Ajit Pawar
Devendra Fadanvis and Ajit PawarAgrowon
Published on
Updated on

Solapur News : राज्यातील २४२ शासकीय आणि सहकारी उपसा जलसिंचन योजना यापुढे सौर ऊर्जाकरणावर सुरू करणार आहोत, त्यामुळे उपसा योजनाची भरमसाट बिले यापुढे येणार नाहीतच, पण शेतकऱ्यांनाही विनाव्यत्यय या योजनांचे पाणी मिळण्यास मदत होणार आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. ८) येथे सांगितले.

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्याचे आयोजन सोलापुरात करण्यात आले होते. याच कार्यक्रमात २३७३ कोटी रुपयांच्या सौरऊर्जाकरण प्रकल्पांचा प्रारंभ उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. या वेळी फडणवीस बोलत होते. आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, समाधान आवताडे, संजय शिंदे, शहाजी पाटील, सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आदी व्यासपीठावर होते.

Devendra Fadanvis and Ajit Pawar
Solar Power : भांडूप परिमंडळात सौरऊर्जेला अधिक पसंती

श्री. फडणवीस म्हणाले, की उपसा जलसिंचन योजनांना सौरऊर्जेद्वारे वीज पुरवठा व्हावा आणि किफायतशीर दरात वीज उपलब्ध व्हावी, यासाठी या योजनांचे सौरऊर्जाकरण करण्याच्या कामाला सुरुवात करत आहोत, यासाठी राज्य सरकारने ३३६६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. जलसंपदा विभागाने सौर ऊर्जाकरण प्रकल्पांसाठी साडेतीन हजार एकरांपेक्षा अधिक जमीन उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठीही आम्ही उपक्रम हाती घेतला आहे.

Devendra Fadanvis and Ajit Pawar
Solar Power : पश्चिम विदर्भातील ६ हजार घरांवर सौर ऊर्जानिर्मिती

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, त्यांनी अतिशय गतीने काम सुरू केले आहे. देशातल्या विविध भागाला प्रकल्प दिले जात आहेत. कोट्यवधींच्या योजना मिळत आहेत. पण विरोधक नको त्या गोष्टी पुढे आणून सरकारविरोधात बोलत आहेत. पण आम्ही शेतकरी, तरूण, महिला, मुलींच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रास्ताविक केले.

शून्य वीजबिलाचे वितरण

या कार्यक्रमात उत्तर सोलापूर तालुक्यातील महिला शेतकरी महानंदा तेली व द्वारकाबाई गुरव यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेतून कृषिपंपांचे वीजबिल शासनाने भरल्याची पावती उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या वेळी महावितरणचे कार्यकारी संचालक सुनील पावडे, पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता अंकुश नाळे आणि अधीक्षक अभियंता सुनील माने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com