Nimn Terna Lift Irrigation : निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेसाठीही तरतूद

Agriculture Irrigation : हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यात निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीसाठी टोकन प्रोव्हिजन अर्थात लेखाशीर्षकात निधीची तरतूद करण्यात आली आहे.
Nimn Terna Lift Irrigation
Nimn Terna Lift IrrigationAgrowon
Published on
Updated on

Dharashiv News : हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यात निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीसाठी टोकन प्रोव्हिजन अर्थात लेखाशीर्षकात निधीची तरतूद करण्यात आली आहे.

त्यामुळे आता लवकरच निविदा प्रक्रिया आणि त्यानंतर प्रत्यक्ष दुरुस्ती कामासही सुरवात होईल. यामुळे तुळजापूर, धाराशिव आणि औसा या तीन तालुक्यातील २३ गावांतील सहा हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

Nimn Terna Lift Irrigation
Purandar Lift Irrigation : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुरंदर उपसा योजना ठप्प

निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्ती खर्चास सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वीच ११३ कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता दिली होती. पाच टप्प्याची ही योजना मागील अनेक वर्षे बंद असल्याने स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी या तिन्ही विभागाची दुरुस्ती आवश्यक होती. या तिन्ही विभागांचा सुसमन्वय साधून या तिन्ही विभागांकडून एकत्रित अंदाजपत्रक तयार करून घेणे मोठे जिकिरीचे काम होते.

Nimn Terna Lift Irrigation
Lift Irrigation Scheme : उपसा सिंचन योजनांना वीज दरवाढीचा ‘शॉक’

अनेक त्रुटींची पूर्तता करून या तिन्ही विभागाच्या समन्वयाने निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्ती कामासाठी ११३ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकीय किमतीच्या कामास तांत्रिक मान्यता मिळवून घेतली. त्यानंतर सलग पाठपुरावा करून प्रशासकीय मान्यताही मिळवून घेतली. जलसंपदा विभागात कोणत्याही प्रकल्प दुरुस्तीसाठी एकूण तरतुदीच्या कमाल दहा टक्के निधी खर्च करता येतो.

निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीसाठी मात्र तब्बल ११३ कोटी रुपयांची आवश्यकता होती. त्यामुळे या प्रस्तावास खास बाब म्हणून मंजुरी मिळवून घेण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले. पाठपुरावा सुरूच ठेवला आणि अशक्यप्राय वाटणारे काम आपल्या सर्वांच्या पाठबळावर निधीच्या तरतुदीपर्यंत आणल्याने लवकरच निविदा प्रक्रिया आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरवात होईल, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com