Water Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : कांदापीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

Water Scarcity : कसमादे भागात यावर्षी रब्बी हंगामात लाल व काही प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड झाली आहे. मात्र उन्हाळ्याची चाहूल लागल्याने विहिरींचे पाणी कमी होऊ लागले आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News : कसमादे भागात यावर्षी रब्बी हंगामात लाल व काही प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड झाली आहे. मात्र उन्हाळ्याची चाहूल लागल्याने विहिरींचे पाणी कमी होऊ लागले आहे. त्यामुळे कांदा पीक वाचविण्यासाठी कूपनलिका तसेच विहिरी खोदत पाण्याचा शोध घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार असल्याने उत्पादन घटणार आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यात लाल कांद्याचे भाव गडगडल्याने झालेला खर्चही वसूल होत नाही. परिणामी, ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी गत झाली आहे. शेतकऱ्यांनी महागडे बियाणे वापरून कांद्याची लागवड केली. परंतु जानेवारीतच विहिरींचे पाणी कमी पडू लागल्याने उन्हाळ कांद्याला फटका बसू लागला आहे.

लाल कांद्याचे उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयत्न झाला असला तरी त्यासही कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हैराण आहेत. कसमादेच्या पश्चिम भागात पाणी मुबलक असले तरी पूर्व भागात मात्र पाण्याची टंचाई भासू लागली आहे. शेतातील कांदापीक वाचविण्यासाठी तसेच काहींनी डाळिंब बागा धरल्या असल्याने पाण्याची गरज ओळखून शेतकऱ्यांनी कूपनलिका खोदण्याचा धडाका लावला आहे.

काहींनी विहिरीत आडवे बोअर मारत पाण्याचा शोध कायम ठेवला आहे, तर काही शेतकरी विहिरी खोल खोदकाम करण्याचा पर्याय आजमावून पाहत आहेत. यामुळे खर्च वाढत आहे आणि उत्पादन मात्र काहीच नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या पिचून गेला आहे. शेतकरी दिवसरात्र एक करून कसेबसे कांद्याचे पीक जगवण्यासाठी धडपड करीत आहे.

कूपनलिका, विहीर खोदाईचे दर

कूपनलिका खोदण्याचा दर...८३ रुपये प्रतिफूट

सरासरी खोदकाम...३०० फूट

मोटार, वायर, पाइप व इतर एकूण खर्च...४० ते ५० हजार

विहिरीतील आडवी कूपनलिका...१२५ रुपये प्रतिफूट

विहिर खोदकाम...८ ते १० हजार रुपये प्रतिफूट

पिकाची होरपळ होऊ नये म्हणून कूपनलिका करत पाण्यासाठी तजवीज करत आहे. ऊन वाढले की पाणी जास्त लागेल. विहिरींचे पाणी कमी होऊ लागल्याने कांदापीक हातातून जाईल. त्यामुळे पाणी शोधण्याची धडपड आहे.
- नानाजी रौंदळ, खुंटेवाडी, ता. देवळा, जि. नाशिक
सध्या कूपनलिका खोधण्यासाठी मागणी वाढली आहे. पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.
- आदेश ठाकरे, संचालक, आदेश बोअरवेल्स, देवळा, जि. नाशिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हळदीचे दर स्थिर; मोहरीचे दर टिकून, उडदाचा बाजार दबावात, गव्हाचे दर स्थिरावले, जिऱ्याचे भाव टिकून

Onion Subsidy: कांदा अनुदान योजना; सातबारावर नोंद नसलेल्या शेतकऱ्यांना २८ कोटींचे अनुदान

Banana Farming: केळी बागेचे उत्पादन वाढवण्यासाठी योग्य खत व पाणी व्यवस्थापन

Farmers Protest : ‘काळा’ पोळा करून सरकारला इशारा

Jayakwadi Dam : जायकवाडीच्या आवकेत, विसर्गात वाढ

SCROLL FOR NEXT