Onion Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Cultivation : मजूरटंचाईसोबत भारनियमनाचे आव्हान; कांदा लागवड अडचणीत

Labor Shortage : एकीकडे मजूरटंचाईने त्रस्त असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वीज वितरणाच्या भारनियमनामुळे लागवड केलेल्या कांद्याला पाणी देणे मुश्कील केले आहे.

Team Agrowon

Nashik News : एकीकडे मजूरटंचाईने त्रस्त असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वीज वितरणाच्या भारनियमनामुळे लागवड केलेल्या कांद्याला पाणी देणे मुश्कील केले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून शेतकऱ्यांकडून वारंवार तक्रार करूनही वीज वितरण कंपनीकडून दखल घेतली जात नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सटाणा तालुक्यातील सुराणे परिसरात शेतकऱ्यांची कांदा लागवड सुरू असताना गेल्या पंधरा दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे.एकीकडे मजूर टंचाईने त्रस्त झालेले शेतकरी कसेबसे मजूर मिळवून कांदा लागवडीसाठी प्रयत्न करीत आहेत. अशातच वीज वितरण मात्र खोडा घालत असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

कांदा लागवडीनंतर कांद्याला पाणी देणे महत्त्वाचे असताना गेल्या पंधरा दिवसांपासून या परिसरात विजेच्या लपंडावामुळे लागवड केलेला कांदा उन्हाच्या तीव्रतेमुळे कोमेजू लागला आहे. कांद्याला वेळेत पाणी मिळाले नाही तर पुन्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रात्र-पहाट करून कांदा जगविण्यासाठी आटापिटा करावा लागणार आहे.

परिसरातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा वीज वितरण कंपनीकडे तक्रारी करूनही लक्ष दिले जात नसल्याने कांदा उत्पादकांत रोष आहे.

कांदा, कांद्याचे रोप, खत व महागडे मजूर संपूर्ण खर्च वाया जाण्याची भीती कांदा उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत. वीज वितरण कंपनीने सुरळीत वीजपुरवठा न केल्यास कार्यालयात तीव्र आंदोलनाचा इशाराही परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

शेतात कांदा लागवड सुरू असतानाही गेल्या पंधरा दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. कार्यालयात अनेक वेळा संपर्क साधूनही दखल घेतली जात नाही. वीज वितरण कंपनीने सुरळीत वीजपुरवठा न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- दीपक ठोके, कांदा उत्पादक, सुराणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT