
Pune News : आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाद्वारे शेतात बेडचा वापर करून मल्चिंग पेपरवर रब्बी कांदा लागवड केली आहे. मेंगडेवाडी येथील युवक शेतकरी राहुल टाव्हरे यांनी घरच्या तीस गुंठे क्षेत्रावर हा प्रयोग केला आहे.
आंबेगावात सध्या उन्हाळ कांद्याची लागवडीची लगबग सुरू आहे. पारंपरिक पद्धतीने पाठ पाण्यावरील लागवडीला फाटा देत मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाच्या आधारे कांद्याचे दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील करत आहे. सध्या युवक शेतकरी राहुल टाव्हरे यांच्याकडे एकूण चार एकर शेती आहे.
त्यापैकी तीस गुंठे क्षेत्रामध्ये मल्चिंगवर कांदा केली आहे. दर वर्षी सुमारे तीन एकरांवर करतात. चार महिने चांगल्या पद्धतीने खते व फवारणीचे नियोजन करून एकरी २५० ते ३०० बॅगेचे उत्पादन घेतले जाते. त्यानंतर काढणीनंतर उत्पादित केलेल्या कांद्याची साठवणूक करून टप्प्याटप्प्याने विक्री केली जाते.
त्यासाठी एक हजार बॅगा बसतील एवढी कांदा चाळ आहे. त्यामुळे दर वर्षी कांद्याची लागवड केली जाते. यंदा तण नियंत्रणाच्या उद्देशाने मल्चिंगचा वापर करून कांदा लागवडीवर भर दिला आहे. याशिवाय झेंडू, ऊस ही पिके ते सातत्याने घेत आहेत.
मल्चिंग पेपरवरील कांदा लागवडीचे फायदे
मल्चिंग पेपरवर एकसारख्या अंतरामुळे दोन रोपांमध्ये अंतर एकसारखे राहते. परिणामी, कांद्याची वाढ चांगल्या प्रकारे होते. प्रति कांद्याचे साधारणपणे प्रति नगाचे ४०० ग्रॅमपर्यंत उत्पादन मिळते. रंग आणि आकार एक सारखा राहिल्याने बाजारात चांगली दर मिळण्यास मदत होते. तणांची वाढ नियंत्रणात ठेवण्यात येते.
खुरपणी खर्च व तणनाशकांच्या फवारणीत बचत होते. टिकवण क्षमतेत चांगली वाढ होत असल्याने बाजारपेठेच्या अंदाजानुसार विक्री नियोजनात संधी मिळते. पारंपरिक पद्धतीमध्ये पाटपाण्यावर कांदा लागवडीसाठी वाफ्यांमध्ये पाणी साठवावे लागत असे, यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होत होता. ठिबक व मल्चिंगमुळे पाण्याची बचत होणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.