Onion Cultivation : उन्हाळ कांद्याच्या कडाक्याच्या थंडीत लागवडी

Onion Farming : यंदा मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यात रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा रोपवाटिकांचे अतोनात नुकसान झाले. परिणामी, नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या कांदा लागवडीचे नियोजन कोलमडले.
Onion Cultivation
Onion CultivationAgrowon
Published on
Updated on

Nashik News : यंदा मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यात रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा रोपवाटिकांचे अतोनात नुकसान झाले. परिणामी, नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या कांदा लागवडीचे नियोजन कोलमडले. त्यामुळे दुबार रोपवाटिका तयार करून लागवडी सुरू आहेत.

मात्र मजूरटंचाई व भारनियमन या अडचणी शेतकऱ्यांसमोर आहे. परिणामी, सध्या थंडीच्या कडाक्यात रात्रीही उन्हाळ कांद्याच्या लागवडी सुरू असल्याने कांदा लागवड करताना जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांसाठी युद्धाचा प्रसंग आहे.

Onion Cultivation
Onion Rate Issue : पहिल्याच दौऱ्यात मंत्री राणेंना करावा लागला शेतकऱ्याच्या रोषाशी सामना; राणेंच्या गळ्यात घातली कांद्याची माळ

उन्हाळ कांद्याच्या उत्पादनाचा खर्च वाढला आहे; त्यात मिळणाऱ्या दराची शाश्‍वती नाही. असे असताना उन्हाळ कांद्याचे मुख्य आगार असलेल्या सटाणा, देवळा व कळवण तालुक्यांत लागवडीला वेग आला आहे. प्रामुख्याने येथे आदिवासी भागातील मनुष्यबळ उपलब्ध होते.

तर गेल्या काही वर्षांत मध्य प्रदेश, गुजरात राज्यांच्या सीमाभागातील मजूर येथे येतात. मात्र तरीही यंदा मजूरटंचाई जाणवत आहे. त्यात निम्मा आठवडा भारनियमन असल्याने रात्री १० ते सकाळी ६ असा वीजपुरवठा होतो. त्यातच दरवर्षीच्या तुलनेत मजूरटंचाईचा प्रश्‍न ऐरणीवर आल्याने रात्री उशिरापर्यंत कांदा लागवडी कडाक्याच्या थंडीत कराव्या लागत आहे.

दिवसा जनित्र वापरून येणारा खर्च परवडणारा नसल्याने शेतकऱ्यांना हाल अपेष्टा सोसून कांदा हंगामाला सामोरे जावे लागत आहे. रात्री लागवडी करण्यापूर्वी बाजूला मर्क्युरी, बल्ब लावून उजेड करावा लागतो. त्यासाठी वेगळी मेहनत व खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

Onion Cultivation
Onion Export : कांदा निर्यातीवरील २० टक्के शुल्क तत्काळ हटवा ; राज्यातील खासदारांची वाणिज्यमंत्री गोयल यांच्याकडे मागणी

जीव धोक्यात घालून कामकाज

कांदा लागवड करणारे मजूर व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना रात्री जागावे लागते. मात्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी होणारे बिबट्यांचे व हिंस्र प्राण्यांचे हल्ले, सर्पदंश यांचाही धोका पत्करावा लागतो आहे. त्यामुळे घेतली जाणारी जोखीम, कष्ट, वाढलेला खर्च सरकारला कधी मिळणार, अशी संतप्त भावना कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आहे.

...या आहेत अडचणी

- भारनियमन असूनही पूर्ण दाबाने वीजपुरवठा नाही.

- मजूर मिळत नसल्याने एकरमागे २ ते ३ हजार रुपये लागवड खर्चात वाढ.

- रात्रीच्या काळोखात फक्त मजुरांनाच नव्हे तर घरच्या सदस्यांना सुद्धा लागवडीसाठी कांद्याचे रोप घेऊन देण्यासह चहापाणी आदींसाठी जागरण करण्याची वेळ.

- रात्री वीजपंपाचा बिघाड झाल्यानंतर दुरुस्ती करताना जीवितास धोका.

- आव्हानात्मक परिस्थितीत कांदा उत्पादन घेऊन सरकारची ग्राहक हिताची धोरणे शेतकऱ्यांच्या मुळावर.

भारनियमन असल्याने रात्री कांदा लागवड करण्याची वेळ आली आहे. त्यात मजूर उपलब्ध नसल्याने त्यांना अधिक पैसे देऊन व जीव धोक्यात घालून कडाक्याच्या थंडीत हंगामात काम करत आहोत. सरकारने शेतकऱ्यांच्या वेदना जाणल्या पाहिजेत.
दीपक बोरसे, कांदा उत्पादक शेतकरी, खामखेडा, ता. देवळा
ज्या शेतकऱ्यांकडे भांडवल आहे ते शेतकरी दिवसा जनित्र लावून कांदा लागवडी करू शकतात. मात्र आमच्याकडे भांडवली नाही. खर्च दरवर्षीच्या तुलनेत वाढला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी सरकारने जाणून घेतल्या पाहिजेत. दिवसा पूर्णवेळ वीजपुरवठा सुरू ठेवावा.
ज्ञानेश्‍वर अहिरे, कांदा उत्पादक, तळवाडे दिगर, ता. सटाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com