MPSC Success Story Agrowon
ॲग्रो विशेष

MPSC Success Story : बेंबळेच्या सागर पवारची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड

PSI Exam Topper : माळीनगर येथील दि मॉडेल विविधांगी प्रशालेचा माजी विद्यार्थी व बेंबळे (ता.माढा) येथील शेतकऱ्याचा मुलगा सागर प्रल्हाद पवार याने स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवून भरारी घेतली आहे.

Team Agrowon

Solapur News : माळीनगर येथील दि मॉडेल विविधांगी प्रशालेचा माजी विद्यार्थी व बेंबळे (ता.माढा) येथील शेतकऱ्याचा मुलगा सागर प्रल्हाद पवार याने स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवून भरारी घेतली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात त्याची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. एका शेतकऱ्यांच्या पोराने मिळवलेल्या या यशाचे समस्त बेंबळेकराना कौतुक वाटते आहे.

त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बेंबळे व माध्यमिक शिक्षण माळीनगरच्या मॉडेल विविधांगी प्रशालेत झाले आहे. त्याने उच्च माध्यमिक शिक्षण विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवीचे शिक्षण प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयात घेतले. त्याचे आई-वडील शेती करतात

सध्या तो आरोग्य अधिकारी म्हणून सातारा जिल्हा परिषद परिषदेत कार्यरत आहे. भविष्यात मंत्रालयातील कक्ष अधिकारी पद तो स्वीकारणार आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना कोणत्याही खासगी क्लासेसच्या प्रलोभनाला बळी पडू नका, सहा महिने स्वतः पुस्तक वाचा, जो विषय आपल्याला अवघड जातो त्याचे क्लासेस नंतर लावा, असा सल्ला त्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना दिला.

स्पर्धा परीक्षांमध्ये संयम खूप महत्त्वाचा असतो. स्पर्धा परीक्षांच वास्तव समजून घ्या. स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येताना एक चांगली पदवी घ्या. ज्यातून तुम्हाला तुमचा प्लॅन बी तयार ठेवता येईल. संयम आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर खूप कमी वेळात ही तुम्हाला एखादी पोस्ट भेटू शकते.
- सागर पवार, नूतन पोलिस उपनिरीक्षक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT