
Solapur News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२२ (जेएमएफसी) ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली. यात देवडी (ता. मोहोळ) येथील शेतकरी कुटुंबातील अश्पाक शहाजान मुलाणी यांची राज्यात २३ क्रमांक घेऊन दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या पदी विराजमान होऊन ऐतिहासिक यशाला गवसणी घातल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अश्पाकचे प्राथमिक शिक्षण वाफळे व देवडी येथील जिल्हा परिषद शाळेत, त्यानंतर माध्यमिक शिक्षण देवडीतीलच महात्मा गांधी विद्यालयात झाले. उच्च माध्यमिक शिक्षण नेताजी ज्युनिअर सायन्स कॉलेज, मोहोळ येथून पूर्ण केले. अश्पाकचे वडील शिक्षक तर आई गृहिणी आहे. घरी शेती असल्याने दुधाचा जोडव्यवसाय आहे. अश्पाक हा त्यांच्या आजोबांचा अत्यंत लाडका असल्याने त्यांच्या बोलण्याचा प्रभाव त्याच्यावर होता.
वडील शाळा शिक्षक असल्याने लहानपणापासून त्याचा हाता खाली तो घडला. ते जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत. नेहमी त्याला सांगत असायचे की, ‘तू अधिकारी होऊन गावाचा विकास व लोकांची सेवा करावी. गोर-गरीब लोकांना तुझ्या कामातून न्याय मिळावा.’ त्यांचे हे शब्द अश्पाक याच्या मनावर कोरले गेले होते. त्यामुळे आपण असेच काहीसे करायचे, आपल्या स्वप्नासोबत सर्वांची स्वप्ने पूर्ण झाली पाहिजेत, असा अट्टहास त्याने बाळगला होता.
यापूर्वी ‘यूपीएसीसी, एमपीएससी’त यश ः
अश्पाकने याआधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) झालेल्या मंत्रालय सहायक विधी अधिकारी गट-ब विधी व न्याय विभागाच्या परिक्षेत यश मिळवेले होते. त्यासोबतच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (‘यूपीएससी’च्या) माध्यमातून घेण्यात येणाऱ्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय विभाग, दिल्ली येथील गंभीर फसवणूक तपास कार्यालयात सहायक संचालक (एसएफआयओ) म्हणून देशात सातव्या क्रमांकाने निवड झाली होती.
या पदावर विराजमान होणारा महाराष्ट्रातून तो एकमेव विद्यार्थी ठरला होता. सध्या अश्पाक हैद्राबाद येथील गंभीर फसवणूक तपास कार्यालयात सहायक संचालक (एसएफआयओ) म्हणून कार्यरत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.