MPSC Exam Success: बीडची ऋचा कुलकर्णी राज्यात पहिली

MPSC JMFC Result: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) न्यायाधीश परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, बीडच्या ऋचा कुलकर्णीने पहिल्याच प्रयत्नात राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण राज्यात आनंदाचे वातावरण आहे.
MPSC Students
MPSC StudentsAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२२ (जेएमएफसी)ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली. यात शेतकरी कुटुंबातील बीडची ऋचा विठ्ठल कुलकर्णी राज्यात पहिली आली.

MPSC Students
MPSC Success Story : शिंदोडीच्या सुपुत्राचा स्पर्धा परीक्षेत डंका

कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२२ ची परीक्षा कोरोनामुळे लांबणीवर पडली होती. कोरोनानंतर ९ सप्टेंबर २०२३ ला परीक्षा झाली. २४ ऑगस्ट २०२४ ला मुख्य परीक्षा झाली. त्यातील ३४३ उमेदवारांची मुलाखतींसाठी निवड झाली होती.

१७ ते २९ मार्च या काळात मुलाखती पार पडल्या. शनिवारी (ता. २९) अंतिम निकाल जाहीर झाला. त्यात ११४ जणांची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पदासाठी तात्पुरती निवड झाल्याची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली. अंतिम निवड यादी लवकरच एमपीएससी जाहीर करणार आहे.

MPSC Students
MPSC Success : शेतकऱ्याच्या मुलीने सर केला लोकसेवा आयोगाचा गड

पहिल्या दहांमध्ये नऊ मुली

या निकालात पहिल्या दहा टॉपर्समध्ये नऊ मुलींचा समावेश आहे. बीडची ऋचा विठ्ठल कुलकर्णीने पहिल्याच प्रयत्नात मोठे यश मिळविले. ऋचा कुलकर्णी राज्यात पहिली आली आहे. सायली संपत झांबरे द्वितीय, किरण संभाजी मुळीक ही तिसरी आली. शिवाणी रामनाथ फाडोळ, तन्वी रहेमान शेख, सोनिया अविनाश गंधले, तनुज रमेश कुसारे, सुवर्णा विनायक शास्त्री, वंदना अरविंद चामले, किरण शांताप्रसाद वर्मा, विपुल एकनाथराव गुंजाळ, अनिकेत लिंबाराव कोकरे आदींचा पहिल्या नऊमध्ये समावेश आहे.

पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले. त्यामुळे स्वप्नपूर्तीचा आनंद आहे. एलएलबीचे शिक्षण घेत असतानाच न्यायाधीश व्हायचे स्वप्न पाहिले होते. ग्रामीण भागातून यश मिळविणे कठीण होते. मात्र अ‍ॅड. गणेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनामुळे कायद्याच्या अभ्यासात पारंगत झाले त्यामुळे यश मिळवता आले. या सोबतच आई-वडील व आजी यांचे प्रोत्साहन वेळोवेळी होते.
ऋचा कुलकर्णी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com