Nanded News: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची किमया रेशीम शेतीमध्ये आहे. यामुळे शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळून सिल्क, मिल्क व मीट मधून उत्पादन दुप्पट वाढवावे, असे प्रतिपादन रेशीम उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी केले.
नागपूर येथील रेशीम संचालनालय, रेशीम विकास अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्याकडून लोहा तालुक्यातील जोमेगाव येथे सोमवारी (ता. १४) रेशीम शेतकरी मेळावा व चर्चासत्र कार्यक्रमात ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी नांदेड रेशीम विकास अधिकारी पी. बी. नरवाडे, हिंगोली रेशीम विकास अधिकारी अशोक वडवळे, परभणी व लातूरचे रेशीम विकास अधिकारी गोविंदराव कदम, सी. केंद्रीय रेशीम मंडळाचे वेज्ञानीक अशोक जाधव
प्रक्षेत्र सहायक एस. ए. गोरे, प्रक्षेत्र सहायक कांचन जाधव, अभय कुलकर्णी, एन. वाय. कोरके, बिदर (कर्नाटक) चॉकी सेंटर संचालक जाकेर पटेल, परिसरातील रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते. श्री. ढवळे म्हणाले, रेशीम उत्पादकांनी दोन गायी किंवा शेळीपालनाची जोड रेशीमशेतीला द्यावी, कुजलेले शेणखत तुतीला द्यावे, सेंद्रिय तसेच जेविक खतांचा वापर तुतीसाठी करावा, तुतीभोवती गजराज गवत लावावे.
किमान दोन एकर तुतीची लागवड करावी. अशोक जाधव यांनी रेशीम अळी कोष न बनवणे, उजी माशी, रसशोषन करणारी कीड या समस्येविषयी माहिती दिली. अशोक वडवळे यांनी कमी-अधिक पावसात केवळ १८ दिवसात येणारे पीक आहे. गोविंदराव कदम म्हणाले, की पिकांच्या तुलनेत चारपट उत्पादन देणाऱ्या रेशीम शेतीकडे वळावे, पाल्याची गुणवत्ता महत्त्वाची आहे.
जाकेर पटेल यांनी तुती लागवडीसाठी महाराष्ट्रातील शेतकरी आजही जागरूक नसल्याची खंत व्यक्त केली. पी. बी. नरवाडे यांनी प्रास्ताविक केले. उत्कृष्ट रेशीम उत्पादक हणमंत शिंदे यांचा महेंद्र ढवळे यांनी सन्मान केला. रेशीम उत्पादक शेतकरी व्यंकटराव शिंदे, प्रभाकर शिंदे,
दशरथ शिंदे, दिगंबर माधवराव शिंदे, दिगंबर किशनराव शिंदे, भास्कर पाटील शिंदे, हणमंत शिंदे, नागोराव शिंदे, बबन पांचाळ, सज्जन शिंदे, राजाराम शिंदे, हणमंत आनंदा शिंदे, विठ्ठल शिंदे, रामेश्वर शिंदे, विश्वास गव्हाणे, मल्हारी गायकवाड, जोमेगाव ग्रामरोजगार सेवक मनोहर भुरे, धनंज बुद्रुक ग्रामरोजगार सेवक संदीप माळेगावे, सतीश माळेगावे आदी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.