
Amaravati News : अमरावती जिल्हा परिषद तसेच १४ पंचायत समित्यांच्या गट व गण रचनेची अधिसूचना सोमवारी (ता. १४) जाहीर करण्यात आली. आगामी निवडणुकीत जिल्हा परिषदेचे ५९ गट व पंचायत समित्यांचे ११८ गण राहणार असून, आजच्या प्रक्रियेनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुकांची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
अमरावती जिल्ह्यात चांदूररेल्वे तालुक्यातील एक सर्कल घटला असून, अचलपूरमध्ये धोतरखेडा या एका गटाची भर पडली आहे. एवढाच केवळ बदल झालेला आहे. जिल्हा परिषदेची गटनिहाय रचना पाहता एकूण ८४१ ग्रामपंचायतींचा त्यामध्ये अंतर्भाव राहणार आहे. त्यामुळे एकूण १९२२ गावांचा समावेशदेखील झाला आहे.
जिल्हा परिषदेचे सर्वाधिक सहा सर्कल अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यामध्ये असून, सर्वांत कमी म्हणजेच केवळ दोन सर्कल चांदूररेल्वे तालुक्यात राहणार आहेत. जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समित्यांचे गणसुद्धा निर्धारित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, निवडणुकीकरिता वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशिन रविवारीच तहसील कार्यालयांना पोहोचविण्यात आलेल्या आहेत.
जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीची गट व गण रचना जाहीर झाल्यानंतर इच्छुकांकडून फिल्डिंग लावण्यात येत आहे. सर्कल रचना जरी जाहीर झाली असली तरी सर्वांच्या नजरा आता आरक्षणाकडे लागल्या आहेत. त्यामुळे अनेकांनी संभाव्य आरक्षण पाहून दुसऱ्या सर्कलची फिल्डिंग लावण्यास सुरुवात सुद्धा केली आहे.
झेडपी निवडणुकीच्या अनुषंगाने लोकसंख्येचे विवरण
जिल्हा परिषदेतील एकूण लोकसंख्या १८ लाख ४ हजार ५१४.
अनु. जातीची लोकसंख्या ३ लाख ३८ हजार ९०४
अनु. जमातीची लोकसंख्या ३ लाख ६० हजार ३९०
झेडपी सदस्यसंख्या ५९
तालुकानिहाय सर्कल व संख्या
धारणी - बैरागड, तलई, कळमखार, टिटंबा, सावलीखेडा (५)
चिखलदरा चुरणी, काटकुंभ, जामली आर, टेंब्रूसोंडा (४)
अंजनगावसुर्जी कापूसतळणी, भंडारज, सातेगाव (३)
अचलपूर - धामणगावगढी, कांडली, धोतरखेडा, पथ्रोट, शिंदी बु., असदपूर,(६)
चांदूरबाजार - करजगाव, शिरजगाव कसबा, ब्राम्हणवाडा थडी, कुऱ्हा, शिरजगाव बंड, आसेगावपूर्णा (६)
मोर्शी - हिवरखेड, पिंपळखुटा मोठा, अंबाडा, नेरपिंगळाई, रिद्धपूर (५)
वरुड - पुसला, बेनोडा, जरुड, आमनेर, लोणी (५)
अमरावती - शिराळा, नांदगावपेठ, पुसदा, वलगाव, अंजनगावबारी (५)
भातकुली - खारतळेगाव, खोलापूर, आसरा (३)
दर्यापूर - येवदा, खल्लार, थिलोरी, पिंपळोद (४)
नांदगाव खंडे - लोणी, माहुलीचोर, मंगरूळचव्हाळा, वाढोणा रामनाथ (४)
चांदूररेल्वे - आमला विश्वेश्वर, घुईखेड (२)
धामणगावरेल्वे - जुना धामणगाव, मंगरूळ दस्तगीर, चिंचोली, तळेगाव दशासर (४)
तिवसा - तळेगाव ठाकूर, वऱ्हा, कुऱ्हा (३)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.