Mulberry Cultivation : राज्यात ३७६५ एकरांनी वाढले तुती लागवडीचे उद्दिष्ट
Chh. Sambhajinagar News : महारेशीम अभियान राबविण्यापूर्वी निश्चित केलेल्या राज्यातील तुती लागवडीच्या उद्दिष्टात आता सुमारे ३७६५ एकरची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आधी सुमारे ८ हजार ३५ एकरांवर असलेले राज्यातील तुती लागवडीचे उद्दिष्ट आता ११ हजार ८०० एकरांवर झाले आहे.
या संदर्भात अधिक माहितीनुसार, राज्यात दरवर्षी तुती लागवड करण्यासाठी सहा महिने आधीच तयारी म्हणून महारेशिम अभियान राबविले जाते. त्यामध्ये तुती लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांची नोंद घेतली जाते. यंदा जानेवारीमध्ये महारेशिम अभियान राबविले होते. मराठवाड्यात ८०३५ एकरांवर तुती लागवडीचा लक्षांक देण्यात आला होता.
त्यामध्ये नागपूर विभागात १०२५ एकरांवर, मराठवाडा विभागातील ३३५० एकरांवर, पुणे विभागातील २४१० एकरांवर, तर अमरावती विभागातील १२५० एकरांवर क्षेत्राचा समावेश होता. परंतु जून मध्ये तुती लागवड लक्षांकात वाढ करण्यात आली आहे.
त्यानुसार आता नागपूर विभागासाठी १४०० एकरांवर, मराठवाड्यासाठी ५०५० एकरांवर, पुणे विभागासाठी ३५०० एकरांवर, तर अमरावती विभागासाठी १८५० एकरांवर क्षेत्रावर तुती लागवडीचे उद्दिष्ट नव्याने देण्यात आले आहे.
‘हरित महाराष्ट्र’ अभियानाचा परिणाम
राज्यातील तुती लागवडीचे उद्दिष्ट वाढण्यात हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानाचा परिणाम स्पष्टपणे दिसतो आहे. जूनमध्ये या अभियान संदर्भात निघालेल्या शासन निर्णयात वृक्ष लागवडीच्या दहा कोटी उद्दिष्ट पैकी तब्बल चार कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट रेशीम (तुती) लागवडसाठी देण्यात आले आहे.
त्यामुळे रेशीम विभागाला तुतीच्या माध्यमातून चार कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सुमारे दोन कोटी ९३ लाख रोप तर तो उपलब्ध आहेत. त्यामधून पाच हजार एकरांपर्यंत उद्दिष्ट गाठता येऊ शकते. शिवाय यंत्रणेची कमतरता जूनमध्ये आलेल्या निर्णयाने रेशीम विभागासमोर उद्दिष्टानुसार वृक्ष लागवडीचे आव्हान असणार आहे.
मराठवाड्यातील तुती लागवड आधीचे व नवीन उद्दिष्ट (एकरामध्ये)
जिल्हा आधीचे आताचे
छ.संभाजीनगर ३५० ६००
जालना ४०० ६००
परभणी ३५० ५००
हिंगोली २५० ३५०
नांदेड ३०० ५००
लातूर ३५० ५००
धाराशिव ६५० ६००
बीड ७०० १४००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.