Panjab Stubble Burning Agrowon
ॲग्रो विशेष

Panjab Stubble Burning : पंजाबमध्ये गव्हाचे अवशेष जाण्यावर भर; जम्मू-काश्मीरच्या राजौरीत जंगलास आग

Jammu Kashmir and Panjab News : उत्तराखंडमधील हजारो हेक्टरचे जंगल आग लागल्याने राखेत मिळाले असतानाच आता जम्मू-काश्मीरच्या राजौरीत जंगलात आग लागली आहे. तसेच पंजाबमध्ये बिनधोकपणे शेतकरी गव्हाचे अवशेष जाळत आहेत. यामुळे प्रदुषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : पंजाबमधील गहू आणि भातपिकाचे अवशेष जाळल्यामुळे होणारे प्रदूषण हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. यामुळे होणाऱ्या हवेच्या प्रदुषणामुळे थेट सर्वोच्च न्यायालयाला आदेश द्यावे लागले होते. मात्र याचा कोणताच परिणाम येथील शेतकऱ्यांवर पडलेला दिसत नाही. येथे पुन्हा एकदा शेतकऱ्यांकडून गहू पिकाचे अवशेष जाळले जात आहेत. यामुळे दिल्ली, पंजाब आणि हरियाणाला प्रदूषणाच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागते. तसेच उत्तराखंड, जम्मू काश्मीरमधील जंगलात आगीच्या घटना घडत आहेत. उत्तराखंडवरून सर्वोच्च न्यायालयाने सरकारले खडे बोल सुनावले होते. यावरून तेथे आग नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना आखल्या जात असतानाच आता जम्मू-काश्मीरच्या राजौरीत जंगलात आग लागली आहे. यामुळे येथे देखील संकट उद्भवले आहे.

गव्हाचे अवशेष जाळली जातात

गेल्या अनेक वर्षापासून पंजाबसह हरियाणाचे शेतकरी पराली म्हणजेच गहू आणि भातपिकाचे अवशेष जाळतात. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे. यावरून सर्वोच्च न्यायालयाने सरकारला आदेश दिले होते. मात्र असे असतानाही आता पुन्हा एकदा पंजाबमध्ये गव्हाचे अवशेष जाळले जात आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा यात वाढ झाली असून २०२२ मध्ये १४, १८२ आणि २०२३ मध्ये १०, ०६५ गव्हाची अवशेष जाळण्याची प्रकरणे समोर आली आहेत.

पंजाबसह हरियाणात गव्हाची कापणी झाली आहे. यामुळे सध्या शेतजमिनी पेरणीसाठी तयार केल्या जात आहेत. यादरम्यान पंजाबचे शेतकरी गव्हाच्या शिल्लक अवशेषांना आग लावण्यात व्यस्त झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये १ एप्रिल ते १६ मे या कालावधीत गव्हाचे शिल्लक अवशेष जाळल्याची एकूण ८५०० प्रकरणे समोर आली आहेत. एकूण प्रकरणांपैकी ९५ टक्के प्रकरणे गेल्या १२ दिवसांतील आहेत. तज्ज्ञांच्या मते, या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली असून ३१ मे पर्यंत या प्रकरणांवर उपग्रहाद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे.

गुरुदासपूरमध्ये एक हजाराहून अधिक प्रकरणे

गुरदासपूरमध्ये गव्हाचे शिल्लक अवशेष जाळण्याचे सर्वाधिक १०२० प्रकरणांची नोंद झाली आहे. यातील ६५ टक्के प्रकरणे ही अवघ्या दोन दिवसांतील असून १५ मे रोजी ५२९ तर १६ मे रोजी १४३ प्रकरणांची नोंद झाली आहे. यात तरनतारनमध्ये ७६९, फिरोजपूरमध्ये ७५०, अमृतसरमध्ये ६७८, मोगामध्ये ५०४ आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांचा मतदारसंघ असलेल्या संगरूरमध्ये ४७७ प्रकरणांचा समावेश आहे.

हवेची गुणवत्ता खराब

गव्हाचे शिल्लक अवशेष जाळल्यामुळे लुधियाना, मंडी गोबिंदगड, चंदीगड आणि पंचकुला आणि राजधानी दिल्लीची हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) घटला आहे. पतियाळा, अमृतसर, जालंधरसह इतर प्रमुख शहरांचा हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीत असून ही हवा हृदयरोगी, फुफ्फुस आणि दमा रुग्णांसाठी घातक आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ज्या भागात हवा गुणवत्ता निर्देशांक अतिशय खराब आहे, अशा ठिकाणी लोकांनी जास्त काळ बाहेर राहू नये.

याचबरोबर गव्हाचे शिल्लक अवशेष जाळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने शेजारील राज्यांतील हवेची गुणवत्ता ढासळू लागली आहे. त्यामुळे लोकांना श्वास घेणे कठीण झाले आहे. विशेषबाब म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने पंजाब सरकारला अनेकवेळा खडी जाळल्याबद्दल फटकारले होते.

तर एनजीटीने अशा घटना रोखण्यासाठी पंजाब प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (पीपीसीबी) कृती आराखडा मागवला होता. मात्र सध्या वाढलेल्या या घटनांमुळे राज्य सरकार किती गंभीर आहे हे उघड झाले आहे.

दरम्यान पीपीसीबीचे अध्यक्ष डॉ. आदर्शपाल विग यांनी सांगितले की, ज्या शेतात गव्हाचे शिल्लक अवशेष जाळले जातील. त्या शेतमालकांची पटवली जात आहे. कायद्यानुसार त्यांना दंड केला जाईल. तर गरज पडल्यास गुन्हा देखील दाखल केले जातील.

राजौरीतील जंगलात आग

जम्मू-काश्मीरमधील राजौरी भागातील दारहाल जंगलात आग लागल्याचे समोर येत आहे. ही आग विझवण्यासाठी वनविभाग आणि अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. यावेळी अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सातत्याने सुरू असून आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

तसेच आग विझवण्यासाठी अग्निशमन व आपत्कालीन सेवा आणि वनविभागाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आग विझवण्यासाठी दोन अग्निशमन दल घटनास्थळी असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागाचे राजौरी मकबूल हुसैन यांनी दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला पूरस्थितीचा आढावा; अतिरिक्त १ हजार ६०० कोटींची मदत जाहीर

Agriculture Technology: धान्य साठवणुकीतून नफ्याचे गवसले तंत्र

Cotton Import Duty: कापूस उत्पादकांच्या अस्तित्वावर घाला

Dragon Fruit Benefits: क्षेत्र वाढते, जाणीव-जागृती वाढवा

Women Empowerment: परभणीतील ग्रामीण भागात ३४ हजार एकल महिला

SCROLL FOR NEXT