Satara News: ग्रामरोजगार सहायकांना दरमहा आठ हजार रुपये मानधन देण्याचे निश्चित होऊन एक वर्षाचा कालावधी उलटून गेला असूनही शासनाकडून या संदर्भातील अध्यादेशाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे अल्प मानधनावर काम करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील १५०० हून अधिक ग्रामरोजगार सहायकांवर उपासमारीची वेळ आली आहे. .महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामरोजगार सहायकांची नेमणूक करण्यात आली आहे. कामाची गरज अथवा आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या कुटुंबांतील अनेक तरुण सध्या ग्रामरोजगार सहायक म्हणून काम करत आहेत. मागील काही वर्षांपासून ते सरकारने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत..Manmad APMC : पगाराअभावी आमच्यावर उपासमारीची वेळ.गाव पातळीवर कार्यरत असलेल्या ग्रामरोजगार सहायकांची रोजगार हमी योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीत भूमिका महत्त्वाची ठरली आहे. या योजनेत संबंधित सहायक त्यांना नेमून दिलेल्या गावात काम करतात. मात्र ही सर्व कामे करूनही त्यांना अत्यंत कमी मानधन मिळत होते. या पार्श्वभूमीवर संघटनेने सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्याचा विचार करून सरकारने त्यांना मानधन देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेतला..Godsakhar Sugar Factory : साखर कारखाना बुडाला, कामगारांवर उपासमारीची वेळ, थकीत पगारासाठी भीक मांगो आंदोलन.त्यानुसार ३ ऑक्टोबर २०२४ रोजी शासनाने ग्रामरोजगार (सेवक) सहायकांना दरमहा आठ हजार रुपये मानधन देण्याचे निश्चित करणारा अध्यादेश काढला. त्याचबरोबर हे मानधन १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू करण्यात येणार असल्याचेही त्यात नमूद करण्यात आले. मात्र आता हा निर्णय होऊन एक वर्षाचा कालावधी उलटला आहे,.ग्रामरोजगार सहायकांची कामेगावातील ग्रामस्थांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.रोजगार हमीच्या कामाचे नियोजन करणे.कामावरील मजुरांची दैनंदिन उपस्थिती नोंदवणे.कामाच्या ठिकाणच्या सुविधांची पाहणी करणे.ग्रामपंचायत आणि मजूर यांच्यातील दुवा म्हणून काम करणे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.