Paddy Stubble Burning : पिकाचे अवशेष जाळण्यावर हरियाणामध्ये बंदी

Paddy Stubble Burning : पंजाब आणि हरियाणामधील गहू आणि भातपिकाचे अवशेष जाळल्याने प्रदूषण वाढत आहे. यामुळे हा विषय प्रत्येक वर्षी चर्चेचा राहतो. यावरून सर्वोच्च न्यायालयाला देखील पंजाब सरकारला आदेश द्यावे लागले होते. यादरम्यान आता पिकाचे अवशेष जाळण्यावर हरियाणामध्ये बंदी घालण्यात आली आहे.
Paddy Stubble Burning
Paddy Stubble BurningAgrowon

Pune News : गेल्या अनेक वर्षांपासून पंजाब आणि हरियाणामधील गहू आणि भातपिकाचे अवशेष जाळले जातात. यामुळे दिल्लीसह शेजारील राज्यात हवेचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. यामुळे हरियाणाच्या फतेहाबादमध्ये गहू पिकाचे अवशेष जाळण्यावर बंदी घातलण्यात आली आहे. याबाबत जिल्हा दंडाधिकारी राहुल नरवाल यांनी आदेश काढले आहेत. तर हा बंदी आदेश रब्बी पीक हंगाम २०२४ संपेपर्यंत लागू असेल.

तसेच कापणीसाठी वापरण्यात येणाऱ्या कंबाइन हार्वेस्टर मशीमध्ये सुपर स्ट्रॉ व्यवस्थापन प्रणाली लावण्याच्या सूचना नरवाल यांनी केल्या आहेत. तर प्रणालीमुळे प्रदूषण कमी होण्याबरोबरच कोरड्या चाऱ्याची समस्याही उद्भवणार नाही, असेही नरवाल यांचे म्हणणे आहे.

Paddy Stubble Burning
Paddy Stubble: पंजाबमध्ये 'या' शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

याआधी फतेहाबादसह हरियाणात फक्त भातपिक काढणीनंतर उरलेले अवशेष जाळण्यास बंदी होती. मात्र यंदा गहू पीकाबाबत देखील जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेताना बंदी घातली आहे. तसेच एसएसएमएस यंत्रणा नसलेल्या हार्वेस्टर मशीनवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

पूर्वी हाताने होणाऱ्या कापणीमुळे प्रदुषण होत नव्हते. पण गहू किंवा भात कापणी वेळी मशीनमधून बाहेर पडणारा भूसा आणि जाळण्यात येणाऱ्या अवशेषांमुळे प्रदुषण होत आहे. यामुळे हा आदेश काढण्यात आला आहे. तर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा दंडाधिकारी नरवाल यांनी दिला आहे. तसेच नरवाल यांनी, कापणीनंतर उरलेले अवशेष न जाळण्याचे आवाहन केले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com