Amravati News: भारतीय कापूस महामंडळाकरिता (सीसीआय) सबएजंट म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस पणन महासंघाकडून तीन वर्षांपूर्वी कापसाची खरेदी करण्यात आली. या प्रक्रियेत होणाऱ्या संपूर्ण खर्चाचा भार करारनाम्यानुसार केंद्र सरकारकडून उचलला जातो. मात्र व्याज तफावतीची ८६.७० कोटींची रक्कम पणन महामंडळाला न मिळाल्याने पणन महासंघाचे बॅंक खाते एनपीए होत यंदाची प्रस्तावित खरेदी रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. .एकाधिकारकाळात कापूस पणन महासंघाकडूनच राज्यातील संपूर्ण कापसाची खरेदी होत होती. त्यामुळे एका अर्थाने पणन महासंघासाठी तो काळ अच्छे दिन सारखाच ठरला होता. या खरेदी प्रक्रियेत ग्रेडरच्या माध्यमातून अर्थकारणाआड कापसाचा दर्जा न तपासताच हमीभावाने कापसाची खरेदी केली जात होती..CCI Cotton Procurement : सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर कापूस ओलाव्याची मर्यादा २० टक्क्यांपर्यंत वाढवा; तेलंगणा सरकारचे केंद्र सरकारला पत्र.त्यामुळे गैरप्रकारही वाढीस लागले होते. त्यानंतरच्या काळात कापूस एकाधिकार योजना संपुष्टात आल्याने कापूस पणन महासंघाचे अस्तित्वही धोक्यात आले. मात्र ही संस्था टिकावी या प्रयत्नांतर्गत ‘सीसीआय’करीता एजंट म्हणून काही टक्के कमिशनवर कापूस पणन महासंघाकडून कापूस खरेदी सुुरू ठेवण्यात आली. सुरुवातीच्या काळात राज्य सरकार सकारात्मक असल्याने यात सातत्य होत..CCI Cotton Procurement : सीसीआयच्या कापूस खरेदी नोंदणीची मुदत वाढवा .परंतु नजीकच्या काळात सरकारची साथ नसल्याने तीन ते चार वर्षांच्या खंडानंतर एकदा खरेदी होते. त्यामुळे सद्यःस्थितीत कापूस पणन महासंघाची आर्थिकस्थिती खालावली आहे. कापूस पणन महासंघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सीसीआय’करीता खरेदी करताना खरेदी प्रक्रियेवर होणाऱ्या संपूर्ण खर्चाची भरपाई केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून होते. तीन वर्षांपूर्वी पणन महासंघाने ६.७० टक्के व्याज दराने कर्ज रक्कमेची उचल केली. त्याचवेळी ‘सीसीआय’ला अवघ्या ३.६१ टक्के व्याज दराने कर्जपुरवठा करण्यात आला होता..व्याज दरातील तफावतीमुळे कापूस पणन महासंघावर ८६.७० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडला. नियमानुसार केंद्र सरकारने या रक्कमेचा परतावा करणे अपेक्षित असताना तो करण्यात आला नाही. ही एकूण थकित रक्कम ११८.२९ कोटी इतकी प्रचंड होती. पणन महासंघाने ३१.५९ कोटी रुपयांच्या व्याजाचा भरणा केल्यानंतर आता ८६.७० कोटी रुपये थकित आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.