Natural Disaster in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरवर निसर्ग कोपला; अतिवृष्टी, भूस्खलनानंतर भूकंपाचे धक्के

Jammu and Kashmir News : २७ एप्रिल रोजी हवामान विभागाने जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा दिला होता. यानंतर आता गुरूवार (२ मे) पर्यंत झालेल्या अतिवृष्टी, भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर आता भूकंपाचे धक्के बसल्याने नागरीक भयभीत झाले आहेत.
Natural Disaster in Jammu and Kashmir
Natural Disaster in Jammu and KashmirAgrowon

Pune News : जम्मू-काश्मीरमधील अनेक भागात २८ एप्रिलपासून मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि बर्फवृष्टी होत आहे. यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. यादरम्यान जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे भूस्खलन आणि पुरामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर येथे अद्यापही बर्फवृष्टी सुरू भूस्खलनाच्या घटना घडत आहे. यामुळे घरांचे नुकसान झाले असून शेकडो रहिवासी बाधित झाले आहेत. तर किश्तवाड जिल्ह्यात बुधवारी (ता. १ मे) झालेल्या भूकंपामुळे नागरीक भीतीच्या छायेखाली आले आहेत. 

जनजीवन विस्कळीत

जम्मू-काश्मीरमधील विविध भागात गेल्या पाच दिवसांपासून अतिवृष्टी, भूस्खलन आणि बर्फवृष्टी सुरू आहे. यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून आता भूकंपाने भीती निर्माण केली आहे. येथील डोडा, रियासी, किश्तवाड, जम्मू प्रदेशातील रामबन आणि काश्मीरमधील किश्तवाडसह अनेक डोंगराळ भागात पावसाचा जोर वाढला असून भूस्खलन झाले आहे. बुधवारी (ता. १ मे) रामबन जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूस्खलनानंतर श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग आणि मुगल रोडसह प्रमुख रस्त्यांवर वाहनांची वाहतूक बंद आहे. मुसळधार पावसामुळे काश्मीरमधील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. 

Natural Disaster in Jammu and Kashmir
Jammu-Kashmir Landslide : मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत; भूस्खलनमुळे अनेक घरे कोसळली

धरणाला भेगा 

अतिवृष्टीने आलेल्या पुरामुळे कुपवाडा जिल्ह्यातील शुमरियाल, खुमरियाल, शतमुकम, सोहीपोरा-हैहामा, फारक्यान या पुलांचे नुकसान झाले आहे. तसेच ग्रामीण विकास विभागाच्या दोन इमारती आणि सहाय्यक संचालक हस्तकला कार्यालयाच्या इमारतीचे देखील नुकसान झाले आहे. डोबन कछामा धरणाला भेगा पडल्या आहेत. 

लोकांचे प्राण वाचवण्याला प्राधान्य 

यादरम्यान जम्मू-काश्मीर प्रशासनाकडून पूरग्रस्त भागात लोकांना वाचवण्याचे काम सुरू असून नागरीकांना सुरक्षीत स्थळी हालवले जात आहे. यावेळी हंदवारा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अझीझ अहमद म्हणाले, आम्ही नुकसानीचे मूल्यांकन करत आहोत. लोकांचे प्राण वाचवणे हे आमचे प्राधान्य आहे.

Natural Disaster in Jammu and Kashmir
Jammu Kashmir Election : जम्मू-काश्‍मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे

सखल भागात पाणी साचले

पुरात आम्हाला आमचे सर्वस्व गमावले आहे, आम्हाला अन्न आणि कपड्यांची गरज आहे. सततच्या पावसामुळे श्रीनगर-जम्मू महामार्गाचा काही भाग पाण्यात बुडाला आहे. श्रीनगर शहर आणि काश्मीर खोऱ्यातील इतर सखल भागात पाणी साचल्याने अनेक भाग प्रभावित झाल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले. 

किश्तवाड जिल्ह्यात भूकंप

अतिवृष्टी, भूस्खलन आणि बर्फवृष्टीने जम्मू-काश्मीरमधील नागरीक हैराण झाले आहेत. यादरम्यान किश्तवाड जिल्ह्यातील भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने 'एक्स' वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, मध्यरात्री किश्तवाड जिल्ह्यात झालेल्या भूकंपाची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल मोजली गेली. भूकंप ३० किलोमीटर खोलीवर होता. या भूकंपामुळे लोकांमध्ये घबराट पसरली असून कोणतीही जीवित किंवा मोठी हानी झाल्याचे वृत्त नाही. 

बर्फवृष्टीची शक्यता 

यावेळी श्रीनगरच्या हवामान केंद्राने शेतकऱ्यांना बुधवारी शेतीशी संबंधित कामे न करण्याचा सल्ला दिला देताना, भूस्खलनाचा इशारा दिला होता. तसेच पुढील २४ तासांत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. मागिल ७२ तासांत झालेल्या पावसामुळे काश्मीरमधील सर्व नद्या, तलाव आणि नाल्यांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. पूर आणि भूस्खलनाचा धोका असलेल्या भागात अनेक शाळा बंद करण्यात आल्या आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com