Agriculture Mechanization Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Scheme: शेतकऱ्यांनो, ट्रॅक्टरसह कृषी अवजारांसाठी सरकारकडून ५० टक्क्यांपर्यंत अनुदान

Krushi Yantrikikaran Yojana: शेती अधिक आधुनिक, सोपी आणि फायदेशीर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने "कृषी यांत्रिकीकरण प्रोत्साहन योजना" सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश लहान आणि अगदी कमी जमिन असलेल्या शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्रसामग्री वापरायला मदत करणे हा आहे.

Roshan Talape

Pune News: शेती अधिक आधुनिक, सोपी आणि फायदेशीर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने "कृषी यांत्रिकीकरण प्रोत्साहन योजना" सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश लहान आणि अगदी कमी जमिन असलेल्या शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्रसामग्री वापरायला मदत करणे हा आहे. या योजनेंतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्रे, ट्रॅक्टरवर चालणारी अवजारे, पिकांची फवारणी करणारी उपकरणे आणि कापणीनंतर प्रक्रिया करणारी यंत्रे खरेदी करण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते.

हे अनुदान यंत्राच्या एकूण किमतीच्या ४० टक्के ते ५० टक्के पर्यंत असते. तसेच, जे शेतकरी कृषी अवजारे बँक सुरू करू इच्छितात, त्यांना त्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या ४० टक्के पर्यंत अनुदानही मिळते.या योजनेचा उद्देश असा आहे की लहान आणि अगदी कमी जमिन असलेल्या शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री वापरता यावी. पारंपरिक पद्धतीने शेती केल्यामुळे खर्च वाढतो आणि नफा कमी होतो.

हे लक्षात घेऊन सरकार शेतकऱ्यांना यंत्रे खरेदीसाठी अनुदान देत आहे. यामुळे शेतीत तंत्रज्ञानाचा वापर होईल, काम वेळेवर आणि सोपे होईल, आणि खर्च कमी होऊन नफा वाढेल. शिवाय, ज्या भागांमध्ये शेतीसाठी वीज किंवा इंधन यांचा वापर कमी आहे, त्या ठिकाणी तो वापर वाढवून हेक्टरला २ किलोवॅटपर्यंत नेण्याचेही सरकारचे उद्दिष्ट आहे.

शेतकरी यंत्र/अवजारे अनुदान तपशील (२०२४-२५)

अ. क्र. अवजारे प्रकार अल्प / अत्यल्पभूधारक इतर शेतकरी

ट्रॅक्टर ----- १,२५,००० ----- १००००० लाख रुपयांपर्यंत

पॉवर टिलर ----- ५०% ----- ४०%

स्वयंचलित यंत्रे -----५०% ----- ४०%

ट्रॅक्टरवर चालणारी अवजारे----- ५०% ----- ४०%

- जमीन सुधारणा मशागत अवजारे ----- ५०% ----- ४०%

- पेरणी, लागवड व कापणी अवजारे ----- ५०% ----- ४०%

- अंतरमशागत अवजारे ----- ५०% ----- ४०%

- पिक अवशेष व्यवस्थापन यंत्र / अवजारे ----- ५०% ----- ४०%

- कापणी व मळणी यंत्र / अवजारे ----- ५०% ----- ४०%

काढणी पश्चात यंत्रे ----- ६०% ----- ५०%

माणूस व बैलचालित यंत्र / अवजारे ----- ५०% ----- ४०%

पिक संरक्षण उपकरणे ----- ५०% ----- ४०%

कृषी अवजारे बँकेची स्थापना ----- ४०%

भाडे तत्वावरील सुविधा केंद्र

शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्री सहज उपलब्ध व्हावी यासाठी कृषी अवजारे बँक आणि सेवा सुविधा केंद्र सुरू केली जाणार आहेत. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना विविध यंत्रे भाड्याने वापरता येतील. त्यामुळे मोठी गुंतवणूक करण्याची गरज भासत नाही. या यंत्रांच्या वापरामुळे उत्पादन खर्च कमी होतो आणि शेती अधिक नफ्याची ठरते.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • शेतकरी ओळखपत्र

  • शेतकरी ओळख क्रमांकामुळे सर्व माहिती उपलब्ध होत असल्याने सातबारा, ८ अ आणि आधार कार्डची गरज नाही.

  • खरेदी करावयाच्या यंत्राचे कोटेशन

  • केंद्र शासन मान्यताप्राप्त तपासणी संस्थेचा अहवाल

  • पूर्वसंमती पत्र

  • स्वयंघोषणापत्र

  • (लागू असल्यास) जात प्रमाणपत्र

योजनेच्या लाभासाठी नियम

  • एका वेळी फक्त एका यंत्रासाठीच शेतकऱ्याला अनुदान मिळू शकते.

  • पूर्वी जर त्या यंत्रासाठी अनुदान घेतले असेल, तर पुढील १० वर्षे त्याच यंत्रासाठी पुन्हा अर्ज करता येणार नाही.

  • मात्र, इतर नवीन यंत्रांसाठी शेतकरी अर्ज करू शकतो.

  • कुटुंबातील कोणाच्या नावावर ट्रॅक्टर असल्यास, त्या ट्रॅक्टरवर चालणाऱ्या अवजारांसाठीही अनुदान मिळू शकते.

  • त्यासाठी ट्रॅक्टर असल्याचा वैध पुरावा सादर करावा लागतो.

ईल आणि शेतीत अधिक नफा मिळेल. हाच या योजनेमागील शासनाचा मुख्य उद्देश आहे.

या योजनेमुळे शेती अधिक आधुनिक सोपी, आणि फायदेशीर होण्यास मदत मिळणार आहे. तसेच यंत्रांच्या वापरामुळे उत्पादनक्षमता वाढणार असून मजुरांचा खर्च कमी होईल आणि शेतीत अधिक नफा मिळेल. हाच या योजनेमागील शासनाचा मुख्य उद्देश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Sugarcane Protest: कोल्हापूरच्या शिरोळमध्ये ऊस आंदोलन पेटले, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Sugarcane Crushing Season: ‘द्वारकाधीश’चे ६ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

Rabi Sowing: अहिल्यानगरमध्ये रब्बी पेरणी दहा टक्के

Cotton Procurement: शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करा

Poultry Exports: पोल्ट्री निर्यातीत दुपटीने वाढ, भारतीय अंड्यांना जगभरातून मोठी मागणी, युएई ठरला सर्वात मोठा खरेदीदार

SCROLL FOR NEXT