Tractor Scheme : ट्वेंटीवन साखर कारखान्याची ट्रॅक्टर, टेलर खरेदी योजना

Sugar Factory : मळवटी (ता. लातूर) येथील ट्वेन्टीवन साखर कारखान्याच्या वतीने ऊस शेतीतील यांत्रीकीकरणासाठी ट्रॅक्टर व ट्रेलर खरेदी योजना हाती घेण्यात आली आहे.
Tractor
TractorAgrowon
Published on
Updated on

Latur News : मळवटी (ता. लातूर) येथील ट्वेन्टीवन साखर कारखान्याच्या वतीने ऊस शेतीतील यांत्रीकीकरणासाठी ट्रॅक्टर व ट्रेलर खरेदी योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी आणि बेरोजगार युवकांना ट्रॅक्टर व टेलर खरेदीसाठी अर्थसाह्य मिळवून देण्यात येणार आहे.

योजनेच्या लाभासाठी साखर कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे. या योजनेमुळे शेतीसोबतच एक चांगला व्यवसाय म्हणून ट्रॅक्टर व ट्रेलर खरेदी करणे फायदेशीर ठरणार आहे. ट्वेन्टीवन शुगर्सने पहिल्या हंगामातच मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस गाळप करण्याचा मान पटकावला आहे.

Tractor
Malegaon Sugar Factory: ‘माळेगाव’साठी राष्ट्रवादीच्या पॅनलपूर्व मुलाखती ठरल्या लक्षवेधी

या हंगामानंतर कारखान्याने सर्वच हंगामात उच्चांकी गाळप केले असून, सभासद ऊस उत्पादकांना विक्रमी ऊसदर दिला आहे. कारखान्याचे उसाचे कार्यक्षेत्र, उसाची उपलब्धता आणि मजुरांची कमतरता लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी जास्तीत जास्त उसाची यंत्राद्वारे तोडणी व वाहतूक करण्यात येत आहे.

तोडणी व वाहतुकीत रोजगाराची मोठी संधी असल्याचे लक्षात घेऊन कारखान्याने ही योजना हाती घेतली आहे. यात शेतकरी व सुशिक्षित बेरोजगारांना ट्रॅक्टर व ट्रेलर खरेदीसाठी सर्व मदत आणि मार्गदर्शन शेतकऱ्यांना कारखान्याकडून करण्यात येणार आहे.

Tractor
Someshwar Sugar Factory: सोमेश्‍वर कारखान्याचे ऊस लागवडीचे धोरण जाहीर

योजनेसाठी अर्जदार हा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा सभासद असावा, त्याच्याकडे किमान दोन हेक्टर क्षेत्र असावे, कोटेशनच्या पंधरा टक्के रक्कम गुंतविण्याची क्षमता असावी, वार्षिक सात समान हप्त्यांमध्ये कर्जाची परतफेड करावी लागेल, कर्जाचा व्याजदर दरसाल दरशेकडा साडेदहा टक्के राहील,

कर्जदार सभासदाच्या नावाने इतर बँकेचे कर्ज नसावे, जमीन असलेले दोन जामीनदार द्यावे लागतील, जामिनदारांकडेही इतर बँकेची कर्जबाकी नसावी, आदी अटी या योजनेसाठी आहेत. योजनेच्या लाभासाठी मुख्य शेतकी अधिकारी रमेश करपे (९८२२८७६२४४) व जनरल मॅनेजर संतोष बिराजदार, ऊसपुरवठा अधिकारी खंडू जोगदंड (९६२३०११६१६) व अभिजित तोडकर (७५८८८७५९३१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com