Sangli News: वांगी (ता. कडेगाव) येथील ताकारी योजनेची वितरिका क्रमांक ११ बुजवून बंदिस्त वाहिनी टाकण्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे यंदाही संबंधित पाटावरील पाणी शेतीला मिळणार नसल्याची भीती व्यक्त होत असून लाभधारक शेतकरी चिंतेत आहेत. तातडीने काम पूर्ण करून पुरेसे पाणी द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे..सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या या वितरिकेतून गेल्या २५ वर्षांपासून शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळत होते. उघड्या वितरिकेतून पाणी वाहत असल्याने परिसरातील विहिरी व कूपनलिकांची पातळीही वाढत असे. ‘‘ताकारी’’चे पाणी बंद झाल्यानंतरही हे साठलेले पाणी पिकांसाठी उपयुक्त ठरत होते..Takari Irrigation Scheme : ताकारीच्या पाण्याने तासगावला दिलासा; ऐन उन्हाळ्यात मिळाले शेतीला पाणी.पाणी बचतीसाठी शासनाने ‘‘बंदिस्त वितरण प्रणाली’’ राबविण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार सर्व वितरिका बुजवून बंदिस्त वाहिनी टाकण्याचे काम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. मात्र वितरिका क्र. ११ वरील काम अपूर्ण असल्याने २७नोव्हेंबर रोजी सोडलेले पाणी या भागातील शेतीपर्यंत पोहोचू शकले नाही. पुढील आवर्तनापूर्वी काम पूर्ण करण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले होते..Takari Irrigation Scheme : ‘ताकारी’च्या बंदिस्त जलवाहिनीला विरोध कायम.दरम्यान, ‘‘ताकारी’’चे पाणी पुन्हा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवरही अनेक ठिकाणी वाहिनी जोडणीचे काम अपूर्णच आहे. वितरिका बुजविल्यामुळे उघड्या पाण्याचा पर्यायही बंद झाला आहे. परिणामी संबंधित क्षेत्र यंदाही पाण्याअभावी राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे..या वितरिकेचे पाणी पूर्वी म्हसोबा ओढ्याकडे जात होते; मात्र तो प्रवाहही आता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे ओढ्यावरील विहिरी कोरड्या पडल्या असून ओढ्यावर अवलंबून असलेल्या शेतीक्षेत्राला मोठा फटका बसत आहे. उघडी वितरिका बुजवून जलवाहिनीचे काम अपूर्ण ठेवल्याने संपूर्ण शेती संकटात सापडली आहे. तातडीने उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे..वांगीतील वितरिका क्र. ११ वर गावाच्या दक्षिणेकडील शेती अवलंबून आहे. मात्र मागील वेळी बंदिस्त जलवाहिनीचे काम अपूर्ण असल्याने पाणी मिळाले नव्हते. अद्यापही पाइप जोडणी पूर्ण झालेली नाही. याची तातडीने दखल घ्यावी; अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जावे लागेल.- डॉ. विजय होनमाने, माजी सरपंच, वांगी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.