Palghar News: निसर्गाने भरभरून उधळण केल्याने जव्हारच्या वैभवात भर पडली आहे. अशातच जंगलव्याप्त परिसरातून रानमेव्याचा हंगाम सुरू झाल्याने बाजारात काजू, हिरवी करवंदे, आंब्याच्या कैऱ्या, रानबोरांच्या विक्रीतून घरखर्चाची बेगमी होत आहे. .आदिवासी महिला पहाटेपासून जंगलातून रानमेवा गोळा करतात. दिवसभराच्या मेहनतीनंतर दुसऱ्या दिवशी स्थानिक बाजारात विक्री करतात. .Farmer Income 2026 : शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी, बाजार सुधारणा आणि महागाई नियंत्रण ठरवणार कृषी क्षेत्राची वाटचाल.सध्या होळी सणाची धामधूम असल्याने रानमेव्याच्या विक्रीतून घरखर्च भागवण्यास मदत होत आहे. चैत्र-वैशाख महिन्यात रानमेवा उपलब्ध होत असल्याने जंगल परिसर सुगंधाने दरवळत आहे..Farmer Income: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणार; पिकांची उत्पादकतावाढ आणि उद्यमशिलतेसाठी महत्वाची घोषणा.रानमेव्याच्या विक्रीमुळे हंगामी रोजगार मिळत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळत आहे. तसेच रानमेवा विक्रीतूनपैसे मिळत असल्याने सणासुदीचा आनंद वाढला आहे. .विशेष म्हणजे. रानमेवाखरेदीला पर्यटकांची देखील पसंती मिळत असल्याने ग्रामीण भागात रोजगाराचे साधन मिळत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.