Shaktipeeth Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Protest: कृषीदिनी शेतकऱ्यांचा लढा पेटला; राज्यभरात शक्तिपीठ महामार्गाविरोधात तीव्र आंदोलन

Save Farm land: शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रखर विरोध सुरूच आहे. शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात कृषी दिनानिमित्त आज (ता.१) शेतकऱ्यांनी राज्यभरात तीव्र आंदोलन केले.

Sainath Jadhav

Pune News: शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रखर विरोध सुरूच आहे. शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात कृषी दिनानिमित्त आज (ता.१) शेतकऱ्यांनी राज्यभरात तीव्र आंदोलन केले. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून या प्रकल्पाला विरोध केला. ८०२ किलोमीटर लांबीच्या या महामार्गामुळे सुपीक जमिनींचे मोठ्या प्रमाणात अधिग्रहण होणार असून, लाखो शेतकरी भूमिहीन होण्याची भीती आहे, असे आंदोलक शेतकऱ्यांना भीती आहे. त्यामुळे या आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळत आहे.

शेट्टी यांचा लढा सुरूच

कोल्हापुरात सकाळी १० वाजल्यापासून शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी एकत्र आले. तर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कोल्हापूर-सांगली महामार्गावर चक्का जाम करण्यात आला. पोलिसांनी मात्र शेट्टी यांच्या घरासमोर मोठा बंदोबस्त ठेवून आंदोलन मागे घेण्यासाठी नोटीस बजावली. परंतु, शेट्टी यांनी मात्र सरकारच्या दबावाला न जुमानता आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. 

आंदोलनस्थळाकडे जाताना राजू शेट्टी म्हणाले, "काही कारण नसताना शेतकऱ्यांना रोखलं जातंय. पोलिसांनीच महामार्ग रोखलाय, मग शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी जायचं तरी कसं? पोलीस जर वाकड्यात जाणार असतील तर शेतकरीसुद्धा कमी नाहीत. ते जिथे असतील तिथे रास्ता रोको करतील. पोलिसांची पळता भुई थोडी होईल. हे लाक्षणिक आंदोलन आहे हे प्रशासनाने लक्षात घ्यावे." असा इशाराही शेट्टी यांनी दिला. 

विधीमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांचं आंदोलन

मुंबईत पावसाळी अधिवेशनादरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने करत 'शक्तिपीठ रद्द'च्या घोषणा दिल्या. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. 

शेतकऱ्यांची भूमिका ठाम

शेतकऱ्यांचा आरोप आहे की, ८६ हजार कोटींचा हा प्रकल्प सुपीक जमिनी नष्ट करेल आणि भूसंपादन कायद्याचे उल्लंघन करेल. सरकारने या प्रकल्पाद्वारे धार्मिक स्थळांना जोडण्याचे आणि पर्यटनाला चालना देण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. मात्र, शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, यामुळे त्यांचे आर्थिक आणि सामाजिक नुकसान होईल. काही कार्यकर्त्यांनी प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणामांवरही प्रश्न उपस्थित केले, विशेषतः सुपीक जमिनी आणि पाणवठ्यांवर होणारा परिणाम.

दरम्यान, आंदोलनामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली, विशेषतः कोल्हापूर आणि सांगलीत रस्ते रोखण्यात आले. सरकारवर दबाव वाढत असताना, शेतकऱ्यांनी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. शक्तिपीठ महामार्गाविरोधातील हे आंदोलन शेतकऱ्यांच्या एकजुटीचे आणि सरकारच्या धोरणांविरुद्धच्या असंतोषाचे प्रतीक बनले आहे. येत्या काळात आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT