Sustainable Agriculture: सुपीक माती, सुरक्षित अन्न: शाश्वत शेतीची नवी दिशा

Entrepreneurs' Opinions : जमीन सुपीकतेसोबत रासायनिक अवशेषमुक्त शेतीमाल उत्पादनासाठी शेतकऱ्यांच्या बरोबरीने निविष्ठा उत्पादकही तितकेच प्रयत्नशील आहेत. तेही काळाची गरज ओळखून पर्यावरणपूरक, नावीन्यपूर्ण निविष्ठा निर्मिती करत आहेत. या उद्योजकांनी शाश्वत शेती आणि आरोग्यदायी अन्नधान्य उत्पादनाबाबत मांडलेली मते...
Soil Fertility
Soil Fertility Agrowon
Published on
Updated on

Soil Fertility : जमीन सुपीकतेसोबत रासायनिक अवशेषमुक्त शेतीमाल उत्पादनासाठी शेतकऱ्यांच्या बरोबरीने निविष्ठा उत्पादकही तितकेच प्रयत्नशील आहेत. तेही काळाची गरज ओळखून पर्यावरणपूरक, नावीन्यपूर्ण निविष्ठा निर्मिती करत आहेत. या उद्योजकांनी शाश्वत शेती आणि आरोग्यदायी अन्नधान्य उत्पादनाबाबत मांडलेली मते...

मातीची सुपीकता वाढवण्यासाठी प्रयत्नशील

शाश्‍वत शेती काळाची गरज आहे. सध्या अनेक कारणांनी पाणी, मातीचे आरोग्य बिघडले आहे. मातीची सुपीकता, पाण्याचा सामू सुधारून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन व उत्पन्न मिळावे यासाठी आयडियल ॲग्री सर्च ही कंपनी देशभर कार्यरत आहे. आमच्या आयडियल फाउंडेशनच्या माध्यमातून माती समृध्द करण्यासाठी, जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शेतकऱ्यांच्या बांधावर परिसंवादांच्या माध्यमातून मार्गदर्शनपर अभियान सुरु केले आहे.

रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय व जैविक खते व निसर्गातून उपलब्ध होणारे घटक यांचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देत आहे. लिफ्टर व्हॅम, लिफ्टर पी., लिफ्टर के., लिफ्टर झेड., व्हॅम गोल्ड (मायकोऱ्हायझा) ही सेंद्रिय खते आम्ही सादर केली आहेत. भाजीपाला पिकांसाठी व्हीजीबूम, डाळिंबासाठी अनार कीट, केळी पिकासाठी बनाना कीट उपलब्ध आहे. त्यात अन्नद्रव्ये व जिवाणूंचा समावेश आहे. उत्पादनांना चांगली मागणी आहे. सर्व उत्पादने प्रदूषणमुक्त, संपूर्ण सेंद्रिय स्वरुपातील असून मातीची सुपीकता व जडणघडण वाढवणारी आहेत. त्यातून पिकाची गुणवत्ताही वाढते.

रासायनिक खतांचा वापर कमी होऊन उत्पादन खर्चात बचत होते. महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, गुजरात आणि राजस्थान या राज्यांतील शेतकऱ्यांसाठी आमची कंपनी कार्यरत आहे. ऊस, द्राक्षे, भाजीपाला, हळद, केळी, डाळिंब, सोयाबीन, कापूस, भात, मसाल्याचे पदार्थ, पॉलिहाऊस, ग्रीनहाऊस, नर्सरी आदींमध्ये आमच्या उत्पादनांचा वापर होत आहे. ‘व्हॅम’ या उत्पादनाबाबत नवे संशोधन व सातत्याने अन्य नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

- प्रकाश औताडे (व्यवस्थापकीय संचालक, आयडियल ॲग्री सर्च, कुपवाड, जि. सांगली)

Soil Fertility
Sustainable Farming: शाश्‍वत शेती हीच पुढची दिशा

सेंद्रिय कर्ब वाढवायला हवा

देशात हरितक्रांती झाल्याने कृषी क्षेत्राची प्रगती झाली. परंतु आता या क्रांतीचे प्रतिकूल परिणाम प्रकर्षाने जाणवत आहेत. त्यामुळे सेंद्रिय शेतीची संकल्पना पुन्हा मूळ धरते आहे. मात्र सेंद्रिय शेतीचा अतिरेक झाल्यास अन्नसुरक्षा धोक्यात येत असल्याचे श्रीलंकेने जगाला दाखवून दिले. त्यामुळे रासायनिक आणि सेंद्रिय अशा दोन्ही तंत्रांचा मेळ घालून रासायनिक अवशेषमुक्त शेतीकडे भारताने जायला हवे.

त्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब करावा लागेल. अर्थात कोणत्याही तंत्राचा अवलंब केला तरी सर्वांचा मुख्य आधार जमीन आणि पाणी हाच आहे. त्यामुळे जलयुक्त आणि क्षारमुक्त माती असलेल्या शिवारांमध्ये एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्य, सिंचन व कीड व्यवस्थापन हाच खरा शाश्वत शेतीचा पाया असेल. पाणी, खतांच्या अतिरेकी वापरामुळे अनेक भागांमध्ये जमिनीच्या सामुने धोका पातळी ओलांडली आहे. त्यावर उपाय म्हणून ‘मल्टिलाइन ॲग्रो इंडस्ट्रीजने अद्ययावत प्रयोगशाळेत स्वसंशोधनातून ‘स्मार्ट लिफ्टर’, ‘ब्लॅक गोल्ड’सारखी उत्पादने आणली आहेत.

‘स्मार्ट लिफ्टर’ पूर्णतः सेंद्रिय आहे. यातील एनआरटी (न्यूट्रिएंट रिलीज टेक्नॉलॉजी) तंत्रज्ञानामुळे मातीच्या कणांवर जमा झालेले अन्नद्रव्य क्षार मोकळे करून ते पाण्यात विरघळण्यास मदत होते. त्यामुळे जमिनीचा सामू, क्षारपड, चोपणपणा हे गुणधर्म कमी होतात. जमिनीचा घटणारा सेंद्रिय कर्ब वाढविण्याची ताकद ‘ब्लॅक गोल्ड’मध्ये आहे.

भात, गव्हाचे काड, नारळाचा टाकाऊ भाग, बांबूपासून बनवलेले बायोचार यात आहे. ते कर्ब व लाभदायक सूक्ष्मजीवांची संख्या वाढवते. त्यामुळे जमिनीत सूक्ष्म पोकळ्या वाढून प्राणवायू खेळता राहतो. यापुढे जमिनीची काळजी घेतली तरच कमी खर्चाची शाश्‍वत शेती करता येईल हे नक्की.

- मिलिंद बर्वे (प्रोप्रायटर, मल्टिलाइन ॲग्रो इंडस्ट्रीज, पुणे)

पीक संरक्षण हवे पर्यावरणपूरक

शाश्‍वत शेती ही काळाची गरज आहे. त्यामुळे पीक उत्पादनक्षमता वाढवतानाच जमिनीचे आरोग्य, पर्यावरण आणि अन्नसुरक्षाही जपणे हे आम्ही उद्दिष्ट ठेवले आहे. रासायनिक खते आणि कीडनाशकांवरील अवलंबित्व कमी करण्यासह जमिनीची दीर्घकालीन सुपीकता, जैवविविधता टिकवणे या हेतूने आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यादृष्टीने पर्यावरणपूरक दोन आधुनिक उत्पादने आम्ही सादर केली आहेत. त्यातील एक मित्र सूत्रकृमीवर आधारित म्हणजे ईपीएन (Entomopathogenic Nematode) असे जैविक कीटकनाशक आहे.

हे सूत्रकृमी मुख्यत्वे जमिनीत राहणाऱ्या व झाडाचे नुकसान करणाऱ्या अळ्यांना शोधून नष्ट करतात. यामुळे रासायनिक कीटकनाशकांची गरज मोठ्या प्रमाणावर कमी होते. अन्य रासायनिक कीडनाशकांप्रमाणे हा जैविक घटक मित्रकीटकांची हानी करीत नाही. कोणत्याही अवस्थेत त्याचा वापर करता येतो. आमचे दुसरे उत्पादन म्हणजे मृदासुधारक आहे. ते मातीची रचना सुधारते. क्षारता कमी करते. सामू व ईसी नियंत्रित करते. २५ टक्के अधिक पाणी धरून ठेवते. सेंद्रिय कर्ब व लाभदायक सूक्ष्मजीव वाढवते. पोषणद्रव्यांची कार्यक्षमतेने उपलब्धता करते. निरोगी माती म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पादन अशी आमची धारणा आहे.

आमची उत्पादने रेसिड्यू फ्री असून, एकात्मिक कीड व्यवस्थापन (आयपीएम) व सेंद्रिय सेंद्रिय शेतीसाठी आदर्श आहेत. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आसामपर्यंत आमची उत्पादने पोहोचली आहेत. तर द्राक्ष, डाळिंब, मिरची, टोमॅटो, चहा, ऊस, केळी, आले, भुईमूग, पेरू आदी पिकांमध्ये शेतकरी त्यांचा वापर करीत आहेत. शेतकऱ्यांकडून सकारात्मक व उत्साहवर्धक प्रतिसाद आहे. येत्या काळात नव्या तंत्रज्ञानावरही काम सुरू आहे. यात ताण प्रतिकारक फॉर्म्यूलेशन्स, कृत्रीम बुद्धिमत्ता आधारित मृदा निदान व अचूक मात्रा पद्धती आदींचा समावेश आहे.

भावीन गांधी, (संचालक, एफआय इनोव्हेटिव्ह सोल्यूशन्स, मुंबई)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com