Shaktipeeth Highway Protest : ‘शक्तिपीठ’विरोधात इंडिया आघाडीची कोल्हापूरमध्ये निदर्शने

Farmers Protest : पोलिसांना चकवा देत इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने कागल परिसरात शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात निदर्शने केली.
Shaktipeeth Highway
Shaktipeeth HighwayAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : पोलिसांना चकवा देत इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने कागल परिसरात शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात निदर्शने केली. त्यानंतर पोलिसांनी जिल्ह्याच्या विविध भागांतून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. ‘शेकाप’चे बाबासाहेब देवकर यांच्यासह २०० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडले. गिरगाव आणि शेंडूर येथेही कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी (ता. ६) कोल्हापूर दौऱ्यावर होते. या वेळी शक्तिपीठ महामार्गविरोधी समितीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलिसांनी शुक्रवारी (ता. ४) रात्रीच विविध गावांमधील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. प्रमुख नेत्यांना पोलिसांनी शनिवारी (ता. ५) सकाळी घरी जाऊन ताब्यात घेतले. बाबासाहेब देवकर आणि कार्यकर्त्यांना करवीर पोलिस ठाण्यात आणून बसवण्यात आले.

Shaktipeeth Highway
Shaktipeeth Project: शक्तिपीठ महामार्ग : काही प्रश्‍न

विजय देवणे आणि काही कार्यकर्ते पोलिसांनी चकवा देऊन आधीच आंदोलनस्थळी पोहोचले होते. कागल परिसरात त्यांनी निदर्शने केली. गिरगाव येथेही कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा निषेध करून आंदोलन केले. या वेळी त्यांनी शासनाच्या विरोधातील घोषणा दिल्या. शेंडूर येथे शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन तेथील आय.टी.आय. कॉलेजमध्ये ठेवले होते. उपमुख्यमंत्री जिल्ह्यातून परतल्यावर अनेकांना सोडण्यात आले. सुमारे २०० जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती आंदोलकांनी दिली.

Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway : कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गाविरोधात एल्गार; सांगलीतील शेतकऱ्याचा राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सवाल

शक्तिपीठ आंदोलनामुळेच कारवाई : फोंडे

शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आंदोलन उभारले म्हणूनच माझ्यावर निलंबनाची कारवाई केली गेली,’ असे स्पष्टीकरण गिरीश फोंडे यांनी दिले आहे. या बाबतचे पत्रक त्यांनी प्रसारमाध्यमांना दिले. पत्रकातील माहितीनुसार, फोंडे हे महापालिकेच्या शाळेत सहायक शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी शिक्षण व सामाजिक विषयांवर आंदोलने केली आहेत.

आंदोलनातील सहभागाबद्दल त्यांच्यावर यापूर्वीही निलंबनाची कारवाई केली होती. मात्र त्यांनी न्यायालयातून ही कारवाई रद्द करून घेतली. शक्तिपीठविरोधात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी १२ जिल्ह्यांत आंदोलन उभे केले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या धोरणाच्या विरोधात भूमिका घेतली म्हणूनच रात्रीतून निलंबनाची कारवाई केली गेली, असा आरोप फोंडे यांनी केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com