Shaktipeeth Highway Protest : एक इंचही जागा मोजू देणार नाही

Land Acquisition : सरकारला महामार्गासाठी एक इंचही मोजणी करू देणार नाही. जबरदस्तीने मोजणी केल्यास पळवून लावू. राज्यातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही.
Shaktipeeth Highway Protest
Shaktipeeth Highway Protest Agrowon
Published on
Updated on

Mumbai News : ‘‘सरकारला महामार्गासाठी एक इंचही मोजणी करू देणार नाही. जबरदस्तीने मोजणी केल्यास पळवून लावू. राज्यातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही. काहीही झाले तरी शेवटपर्यंत एकजुटीने लढू, असा निर्धार शक्तिपीठ विरोधी नेत्यांसह १२ जिल्ह्यांतून आलेल्या शेतकऱ्यांनी आझाद मैदान येथे केला.

राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी राज्यकर्त्यांच्या विरोधात बुधवारी (ता.१२) जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. या वेळी विरोधी पक्षातील नेत्यांनी शेतकऱ्यांची भेट घेत समर्थन दिले. तसेच तुम्ही रस्त्यावरची लढाई लढत असाल तर आम्ही रस्त्यावरच्या लढाईसोबत विधान भवनातील लढाई लढू, असे आश्वासन दिले.

Shaktipeeth Highway Protest
Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’विरोधी एल्गार ; सरकारही ठाम ; विधान परिषदेत स्थगन प्रस्ताव; महामार्ग पूर्ण करायचाच असल्याची मुख्यमंत्र्याची भूमिका

दरम्यान ८ एप्रिल रोजी लातूर येथे राज्यस्तरीय शेतकरी परिषद घेण्यात येणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. या वेळी ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

आमदार सतेज पाटील म्हणाले, की या महामार्गाला अनेक ठिकाणी रस्ते जोडले जाऊ शकतात. ८६ हजार कोटींचा रस्ता करण्यापेक्षा चार-पाच हजार कोटी रुपये द्या, त्यामुळे रस्ते जोडले जातील. ८६ हजार कोटी वसूल करण्यासाठी २८ वर्षे लागतील. वर्षाला ६० हजार वाहने या मार्गावरून जायला हवीत. ३० वर्षांत हे पैसे वसूल होणार नाहीत. असे असतानाही सरकार अट्टहासासाठी करत आहे.

Shaktipeeth Highway Protest
Shaktipeeth Highway : नाव देवाच्या आळंदीचे, जाताहेत चोराच्या आळंदीला ः शेट्टी

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, की निवडणुकीआधी एकनाथ शिंदे यांनी हा महामार्ग रद्द करतो, असे सांगितले होते. त्यांचा शब्द आता कुणी ऐकत नसेल, तर सरकारमध्ये त्यांचे कुणी ऐकत नाही असे आम्ही समजू. जयंत पाटील म्हणाले, की एकाही नागरिकाने या रस्त्याची मागणी केलेली नाही.

सरकार हे नवे नवे रस्ते करण्यात एवढा का इंटरेस्ट घेत आहे, हे कळायला मार्ग नाही. या आंदोलनात आमदार सचिन अहिर, समन्वयक गिरीश फोंडे, विजय देवणे, माजी आमदार के. पी. पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार संजय घाटगे, अंबरीष घाटगे, विश्वजित कदम, गोविंद घाटोळ यांच्यासह बाधित शेतकऱ्यांच्या क्षेत्रातील लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चर्चेची मागणी शेतकऱ्यांनी फेटाळली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना निरोप पाठवून मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी चर्चा करा असे सांगितले. मात्र प्रकाश आबिटकर यांना कोणताही अधिकार नाही. आम्ही त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते निर्णय देणार आहेत का, असा सवाल करत चर्चेची मागणी फेटाळल्याचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com