Cow Milk Rate agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate : पुरवठा सुधारल्याने गाईच्या दूध खरेदी दरात घसरण

Milk Production : राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांनी गाय दुधाचे खरेदी दर प्रतिलिटर एक ते दोन रुपयांनी कमी केले आहेत.

Team Agrowon

Maharashtra news : राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांनी गाय दुधाचे खरेदी दर प्रतिलिटर एक ते दोन रुपयांनी कमी केले आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा जादा असल्यामुळे दरात घसरण होत असल्याचा दावा डेअरी चालकांनी केला आहे.

डेअरी क्षेत्रातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, अनेक जिल्ह्यांत समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट येणार आहे. सणासुदीला दुधाचा पैसा सोडता शेतकऱ्यांकडे उत्पन्नाचे अन्य साधन नाही. पावसाअभावी चारा पिके देखील संकटात सापडतील व चाऱ्याची तीव्र टंचाई तयार होईल, एक अशी अटकळ होती. परंतु सध्या तरी तीव्र चाराटंचाई सदृश्य स्थिती नाही. शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसामुळे काही भागांमध्ये गाय दुधाचा पुरवठा कमी झालेला नाही. याउलट सणासुदीच्या तोंडावर दुधाला असलेली अपेक्षित मोठी मागणी अजूनही तयार झालेली नाही. त्यामुळे गाय दुधाच्या पुरवठा साखळीत सद्यःस्थितीत अडथळा आलेला नाही. बाजारात मागणीच्या तुलनेत गाईच्या तुलनेत जास्त झालेला आहे. परिणामी खरेदी दरात घसरण झालेली आहे.

पुणे जिल्हा सहकारी दूध (कात्रज) संघाने २१ ऑक्टोबरपासून गाय दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर दीड रुपयाने कपात केली आहे. ‘‘आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी व लोण्याचे दर कमी झालेले आहेत. यामुळे खाजगी डेअरी चालकांनी दुधाच्या खरेदी दरात काहीशी कपात केलेली आहे. परिणामी कात्रज संघाने खरेदी दरात प्रति लिटर दीड रुपया कपात केलेली आहे. शेतकऱ्यांकडून आता ३.५ व ८.५ श्रेणीतील दूध प्रतिलिटर ३० .५० रुपये (वरकड खर्चासह ३१.३० रुपये) दराप्रमाणे स्वीकारले जात आहे,’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे.

राज्यात दुधाचा पुष्ट काळ सुरू झालेला आहे. जादा पुरवठ्याच्या तुलनेत दुधाला मागणी मात्र वाढलेली नाही. दुसरीकडे दुष्काळ सदृश्य स्थितीचा परिणाम चारा पुरवठ्यावर अद्याप तरी झालेला नाही. त्यामुळे बाजारात गाय दुधाचे खरेदी दर कमी होत असल्याचे दिसते आहे.
- चेतन नरके, संचालक, गोकुळ

बाजारात गाय दुधाची मागणी मर्यादित असतानाही कात्रज संघाकडून दूध स्वीकारणे चालूच आहे. शेतकऱ्यांचे अतिरिक्त दूध नाकारता येत नाही. हे दूध एरवीप्रमाणे भुकटी करण्याकडे वळविणे परवडत नाही. परिणामी कमी दरात खासगी डेअरी चालकांना या दुधाची विक्री करून विल्हेवाट लावली जात आहे. त्यामुळेच खरेदी दर कमी करण्यात आल्याचा युक्तिवाद केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate In Maharashtra : कांदा निर्यात धोरणामुळेच दर घसरले असे म्हणता येणार नाही; लोकसभेत केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Opposition MPs Protest: विरोधी खासदारांची काळे कपडे घालून संसद परिसरात निदर्शने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज तहकूब

El Nino Update : एल निनो मार्च २०२७ पर्यंत टिकण्याची ९७ टक्के शक्यता; अमेरिकेच्या हवामान संस्थेचा अंदाज

Rainwater Harvesting: पर्जन्यजल संधारण : महत्त्व, नियोजन अन् प्रभावी व्यवस्थापन

Smart Mango Farming: ९० एकरांतील व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे झाले सुलभ

SCROLL FOR NEXT