Team Agrowon
दुभत्या जनावरांना वर्षभर हिरवा चारा उपलब्ध असणे हा यशस्वी दुग्धोत्पादनाची पहिली पायरी आहे. समीश्र चारा उत्पादन हे जनावराच्या समतोल आहाराच्या दृष्टीने महत्वाचे आहे हे साध्य करण्यासाठी एकदल व व्दिदल चारा पिकाच नियोजन करण आवश्यक आहे. जनावरांच्या आहारात एकदल व्दिदल चा-याचे प्रमाण निम्मे निम्मे असावे.
मध्यम जमिनीत ज्वारी या चारा पिकाची लागवड करता येते. एक नांगरट व २ ते ३ वेळा वखरणी करुन जमीन तयार करावी. जून जुलै या कालावधीत पेरणी करावी. लागवडीसाठी रुचीरा आर-४-११, मालदांडी ३५-१, निळवा, एमपी चारी, पुसा चारी, आय एस ४७७६, एएसजी १४, एमकेव्ही चारी या वाणांची निवड करावी.
पेरणीसाठी हेक्टरी २० किलो बियाणे लागते. पेरणी ३० बाय ४५ सेंमी अंतरावर पाभरीने करावी. ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश द्यावे. अशा पद्धतीने लागवड केल्यास चाऱ्याचे हेक्टरी ४० ते ४५ टन उत्पादन मिळते.
हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीत ज्वारी या चारा पिकाची लागवड करता येते. एक नांगरट व २ वेळा वखरणी करुन जमीन तयार करून पेरणीयोग्य पाऊस पडल्यास जून ते ऑगस्ट या कालावधीत पेरणी करावी. पेरणी साठी जाएन्ट बाजरा, जाएन्ट बाजरा गराजको यापैकी वाणांची निवड करावी.
पेरणीसाठी हेक्टरी १० किलो बियाणे लागते. पेरणी ३० बाय ४५ सेंमी अंतरावर पाभरीने करावी. २०–२५ टन कंपोस्ट, नत्र ८० किलो, स्फुरद ४० किलो आणि पालाश ४० किलो द्यावे. अशा पद्धतीने लागवड केल्यास चाऱ्याचे हेक्टरी ३५ ते ४० टन उत्पादन मिळते.
मका चारा पिकाची लागवड मध्यम ते भारी जमिनीत करता येते. एक नांगरट व २ ते ३ वेळा वखरणी करुन जमीन तयार करून पेरणीयोग्य पाऊस पडल्यास जून ते ऑगस्ट या कालावधीत पेरणी करावी.
पेरणी साठी आफ्रीकन टॉल, मांजरी, कंपोझीट विजय, गंगासफेद डेक्कन हायब्रीड यापैकी वाणांची निवड करावी. पेरणीसाठी हेक्टरी ४०-४५ किलो बियाणे लागते. पेरणी ३० बाय ४५ सेंमी अंतरावर पाभरीने करावी. २०–२५ टन कंपोस्ट, नत्र ८० किलो, स्फुरद ४० किलो आणि पालाश ४० किलो द्यावे.