Cooperative Milk Organization : सहकारी दूध उत्पादक संस्था अवसानात काढण्याचा आदेश रद्द करण्याची मागणी

Doodh Sangh : जिल्ह्यातील दूध उत्पादक सहकारी संस्था अवसायनात काढण्याचा आदेश रद्द करावा, अशी मागणी दूध उत्पादक सहकारी संस्थांच्या संचालकांनी सहाय्यक निबंधकांची भेट घेऊन केली.
Milk Rate
Milk Rate Agrowon
Published on
Updated on

Washim News : जिल्ह्यातील दूध उत्पादक सहकारी संस्था अवसायनात काढण्याचा आदेश रद्द करावा, अशी मागणी दूध उत्पादक सहकारी संस्थांच्या संचालकांनी सहाय्यक निबंधकांची भेट घेऊन केली. अवसायनाचा आदेश काढलेल्या दूध उत्पादक सहकारी संस्थांबाबतचा निर्णय रद्द करावा असे म्हटले.

याबाबत जिल्हा निबंधकांना भेटलेल्या जिल्ह्यातील संचालकांमध्ये सभापती दामूअण्णा गोटे, मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष वामनराव अंभोरे, विठ्ठलराव पाकधने, राजेंद्र बारड, किशोर पाटील जाधव, विनोद महाले, संतोष हरणे, अन्सार भाई आदींनी अधिकाऱ्यांची भेट घेतली. शासनाच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील दूध संस्था डबघाईस येऊन शासकीय दूध शीतकरण केंद्र ओस पडले आहे.

वाशीम जिल्ह्यात सध्या भरपूर दूध उत्पादन आहे. हिंदुजा महिला दूध कंपनी वाशीम जिल्ह्यातून प्रतिदिन बारा हजार लीटर दूध खरेदी करीत आहे. शासनाच्या एक वेळच्या दूध संकलनात अनेक दोष असल्याने त्याचा परिणाम ग्रामीण भागातील गरीब दूध उत्पादकांना सहन करावा लागला. शासनाचे दूध खरेदी दर कमी असून सुद्धा शासनाला बऱ्याच संस्थांनी बारमाही दूध पुरवठा केला.

Milk Rate
Solapur Doodh Sangh : दूध संघाची पंढरपुरातील जागा विक्रीचा निर्णय

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीला पूरक व्यवसाय मिळावा म्हणून उत्पादकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन एकत्र येऊन सहकारी दूध उत्पादक सहकारी संस्था स्थापन केल्या. त्या संस्था बंद करून या संस्थांना शासनाने अवसायनात काढण्याचा आदेश दिला आहे. या संस्थांना शासनाने कोणत्याही प्रकारचे अनुदान दिलेले नाही. शासनाने शासकीय दूध वाहतूक बंद केली.

Milk Rate
Gokul Doodh Sangh : ‘गोकुळ’च्या कार्यालयावर दूध उत्पादकांचा मोर्चा

तेव्हापासून संस्थांना स्वखर्चाने वाहतूक खर्च करावा लागत आहे. ते संस्थांना परवडत नसल्याने व जनावरांच्या वाढत्या किमती, पशुखाद्याचे वाढते दर, वाढती मजुरी या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर उत्पादक अडचणीत येण्यास शासनास जबाबदार आहे.

आजही शासनाने जिल्ह्यातील संकलन केंद्र सुरू करून शासकीय वाहतूक सुरू केल्यास जिल्ह्यातील बऱ्याच संस्था दूध पुरवठा करण्यास तयार आहेत. दूध सहकारी संस्था या भांडवलदाराच्या नसून गरीब शेतकऱ्यांच्या आहेत. शासनाने संस्थांबाबतचा आदेश त्वरित रद्द करावा व संस्था लेखापरीक्षण व कोरोनामुळे थांबलेली निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यास संधी द्यावी, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com