Banana  Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Rate : केळीदरात घसरण; उत्पादक संकटात

Market Update : निर्यातक्षम केळीचे दर प्रतिकिलो आठ ते दहा रुपयांपर्यंत घसरले आहेत. त्यामुळे केळी उत्पादक अडचणीत आले आहेत.

Team Agrowon

Solapur News : शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने केळीचे पीक आणले असता, अचानक मागील आठ दिवसांपासून दररोज केळीच्या दरात मोठी घसरण होत आहे. निर्यातक्षम केळीचे दर प्रतिकिलो आठ ते दहा रुपयांपर्यंत घसरले आहेत. त्यामुळे केळी उत्पादक अडचणीत आले आहेत.

सध्या निर्यातक्षम केळीला प्रतिकिलोला २२ रुपये तर स्थानिक बाजारात कॅरेटसाठी सुपर खोडवा केळी १६ रुपयांपर्यंत शिवार खरेदीत दर मिळत आहे. तर सुपर खोडवा केळी निर्यातीसाठी बहुतांश कंपन्यांकडून बंद करण्यात आली आहे. या वर्षी केळीचे पीक चांगले आले असताना निर्यातक्षम केळी प्रतिकिलो २९ ते ३२ रुपये व खोडवा केळीचा २५ रुपयेपर्यंत असलेला दर पंधरा दिवसांतच २२ रुपयांपर्यंत व खोडवा केळीचा १० ते १४ रुपयांपर्यंत खाली आला आहे.

परिणामी, केळी उत्पादकांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. निर्यातक्षम केळीत प्रतिकिलो दहा रुपये व खोडवा केळीत १० ते १५ रुपयांपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

वर्षभर पिकाचे संगोपन केल्यानंतर आता केळी काढणीस आली आहे. परंतु दर घसरल्यामुळे पर्यायी पीक म्हणून नव्याने उसाकडून केळीकडे वळलेल्या शेतकऱ्यांचा निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

जळगाव येथील केळी उत्तर भारतातून मोठ्या प्रमाणात पाठवली जाते. परंतु थंडीमुळे उत्तर भारतातून मागणी कमी झाली आहे. त्यामुळे निर्यातदार कंपन्यांना येथील मालकमी दरात मिळत आहे. तसेच आंध्र प्रदेशातील केळी हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आंध्र प्रदेशात खरेदी करत आहेत.
सनी इंगळे, केळी निर्यातदार
कर्नाटक तसेच आंध्र प्रदेशातून केळीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे केळीच्या दरात घसरण झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. केळीला प्रतिकिलो ३०-३२ रुपयापर्यंत दर मिळेल, असा अंदाज होता. मात्र हा अंदाज फोल ठरला आहे.
अभिजित काळे, केळी उत्पादक, पोमलवाडी, ता. करमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT