Banana Rate : आंध्रची केळी निर्यात का वाढली?

Team Agrowon

देशात निर्यातीच्या केळीची आवक आंध्र प्रदेशात वाढली आहे. तेथून आखातसह इतर भागांत रोज ३५ ते ३६ कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची पाठवणूक सुरू आहे.

Banana Disease | Agrowon

तमिळनाडू भागातूनही रोज पाच ते सहा कंटेनर निर्यात होत आहे. दाक्षिणात्य भागात निर्यातीच्या केळीचे दर सध्या प्रतिक्विंटल २३०० रुपये असे आहेत.

Banana Disease | Agrowon

राज्यात सोलापूर व लगतच्या भागातून रोज १४ ते १५ कंटेनर केळीची निर्यात परदेशात होत आहे.

India Banana Producing | agrowon

देशात निर्यातीच्या केळीस सोलापुरात सर्वाधिक २४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.

Banana Farm | agrowon

खानदेशात अद्याप निर्यातीच्या केळीची आवक कमी किंवा अत्यल्प आहे.

Banana Farm | agrowon

थंडीत खानदेशात केळी बागा व्यवस्थित येत नसल्याने थंडीत काढणीवर येणाऱ्या बागांची लागवड टाळली जाते. यामुळे सध्या खानदेशात केळीची आवक अत्यल्प स्थितीत किंवा कमीच आहे.

Banana Processing | Agrowon
क्लिक करा