Banana Rate: खानदेशात वाढली निर्यात केळीची आवक

Team Agrowon

देशात निर्यातीच्या केळीची आवक वाढली आहे. सध्या रोज ५० ते ५२ कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात आखातासह इतर भागात होत आहे.

Banana Crop Insurance | Agrowon

निर्यातीच्या केळीला २३०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. राज्यातून सध्या १८ ते २० कंटेनर केळीची पाठवणूक परदेशात होत आहे. सर्वाधिक निर्यात सोलापुरातून होत आहे.

Banana Disease | Agrowon

त्यापाठोपाठ आंध्र प्रदेशातून रोज १८ ते १९ कंटेनर केळीची निर्यात होत आहे. तसेच अन्य दाक्षिणात्य भागांतूनही ११ ते १२ कंटेनर केळी आखातात पाठविली जात आहे.

India Banana Producing | agrowon

राज्यातील दक्षिण, पश्चिम भाग व दाक्षिणात्य राज्यांत थंडीच्या कालावधीत केळी पिकात चिलिंग इंज्युरी (थंडीचा फटका) होत नाही.

Banana Farm | agrowon

यामुळे या भागात थंडीच्या कालावधीतही केळीची लागवड केली जाते. परिणामी या भागात केळीची आवक या कालावधीत बऱ्यापैकी आहे, असे केळी उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांनी सांगितले.

Banana Cultivation | Agrowon

खानदेशात थंडीमुळे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये केळीची लागवड टाळली जाते. यामुळे या काळात केळीची आवक अल्प असते. 

Banana Farm | agrowon