Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाच्या सौर ऊर्जा प्रकल्पावरून वातावरण तापले, मच्छिमारांचे जलसमाधी आंदोलन

Fishermen protest against Solar Power Project : पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर जलाशयावर सध्या एका प्रकल्पावरून मच्छीमार आक्रमक चांगेलच आक्रमक झाले आहेत. तर त्याच्यांकडून जलसमाधी घेण्यासाठी आंदोलन केले जात आहे.
Jayakwadi Dam
Jayakwadi Dam Agrowon
Published on
Updated on

Paithan News : केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचा जायकवाडी धरणावरील प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्प हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. तो रद्द कारावा या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील हजारो मच्छीमार आक्रमक झाले आहेत. तर जायकवाडी धरणात आयोजित १५ हजार एकरातील तरंगता सौर प्रकल्प रद्द करावा यासाठी मच्छीमारांनी जलसमाधी घेण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान आज बुधवारी (७ रोजी) दुपारी १२ वाजता होणारे आंदोलन पोलिस दडपतील म्हणून मच्छीमारांनी गनिमीकावा करत पहाटेच धरणावर धाव घेतली. ज्यामुळे पोलिसांची तारांबळ उडालेली दिसून आली. तर जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही. तोपर्यंत मागे हटणार नाही असा पवित्रा हजारो मच्छीमारांनी घेतला आहे.

येथील जायकवाडी धरणावर सौरऊर्जा प्रकल्प करण्यात येणार आहे. यासाठी धरणातील नाथसागर जलाशयावर १५ हजार एकरावर सर्वे केला जात असून तो नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन या शासकीय संस्था करत आहे. तर त्यांनी हे काम जीओ सर्व्हिसेस मॅरीटाइम प्रा. लि. या एजन्सीला दिले आहे. हा सर्व्हे तात्काळ बंद करण्यात यावा हा मागणीसाठी हजारो मच्छीमारांनी नाथसागरात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे.

Jayakwadi Dam
Water Crisis : मराठ्यवाड्याची चिंता वाढली! जायकवाडी धरणातून पिकाला पाणी नाही?

हजारो मच्छीमारांचा व्यवसाय संपुष्टात

केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असून तो जायकवाडी धरणाच्या जलाशयात करण्यात येणार आहे. यामुळे येथील छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील २२ हजार कुटुंबांच्या व्यवसायावर कुऱ्हाड येणार पडणार आहे. तर २ लाख मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. सध्या येथील मच्छीमार हा दिवसा तीनशे ते चारशे येथून मच्छीमारीकरून कमावतो. पण जर हा सौरऊर्जा प्रकल्प झाला तर हजारो मच्छीमारांचा व्यवसाय संपुष्टात येईल.

हजारो मच्छीमारांचा उद्रेक

दरम्यान हजारो मच्छीमारांचा उदरनिर्वाह या धरणावरच असल्यानेच हा प्रस्थापित सौरऊर्जा प्रकल्प रद्द करण्याची मागणी आंदोलक करत आहेत. हा प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्यासाठी हजारो मच्छीमारांनी आज पहाटे आवाज उठवला आहे. तर याच्याआधी देखील याबाबत मच्छीमारांनी प्रशासनास निवेदन देऊन प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र यावर प्रशासनाने कोणतेही ठोस निर्णय घेतला नाही. यामुळे आज मच्छीमारांचा उद्रेक झाला आहे.

Jayakwadi Dam
Solar Project : ‘गोकुळ’ उभारणार वीज बचतीसाठी सौरऊर्जा प्रकल्प

कहार समाज सहभागी

दरम्यान हे जलसमाधी आंदोलन करण्यासाठी दोन दिवसांपासून कहार समाजातील मच्छीमारांचे कुटुंबांनी तयारी केली होती. तर आज दुपारी १२ च्या सुमारास होणाऱ्या जलसमाधी आंदोलनासाठी काही लोक आधीच जायकवाडी धरणाच्या नाथसागराच्या परिसरात दाखल झाले होते. मात्र जलसमाधी आंदोलन रोखण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी विशेष प्रयत्न करत मोठा फौजफाटा तैनात केला होता. यावरून गनिमिकाव्याचा वापर करून मच्छीमारांनी पहाटेच हे आंदोलन सुरू केले.

आंदोलन सुरु राहणार

दरम्यान या प्रकल्पावरून मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे आक्रमक झाले आहेत. तर नाथसागरातील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करणारा आदेश शासन जोपर्यंत काढत नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असा इशारा मच्छीमार संघटनेने दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com