Pomegranate Export Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Export : ४५० खोके -एकदम ओके... ; बंदी उठल्यानंतर पहिल्यांदाच डाळिंब निघाले विमानाने न्यूयॉर्कला

Pomegranate Export : अमेरिकेने सन २०१८ मध्ये भारतीय डाळिंबाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र, आता बंदी उठवल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईतून ४५० खोके विमानाने अमेरिकेला रवाना झाले.

Team Agrowon

Pomegranates Export Ban : अमेरिकन सरकारने भारतीय डाळिंबाच्या दाण्यामध्ये फळ माशीचा प्रादूर्भाव झाल्यामुळे २०१८ बंदी घातली. ती अमेरिकेने उठवल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईतून ४५० खोके म्हणजे १५० किलो डाळिंब विमानाने अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे रवाना करण्यात आले.

अमेरिकेत २०१७-१८ मध्ये भारतातून पाठवलेल्या डाळिंबाच्या दाण्यामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे अमेरिका सरकारने भारतातून डाळिंबाची आयात करण्यास बंदी घातली होती. अपेडा आणि एन.पी.पी.ओ. भारत सरकार यांनी संयुक्तरित्या अमेरिकेच्या कृषी विभागाशी वारंवार चर्चा केली असता मानकांच्या आधारे २०२२ मध्ये निर्यात बंदी उठवण्यात आली. त्यासाठी काही नियम आणि अटी घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार डाळिंबाच्या विकेंद्रीकरणाची प्रकिया करून प्रायोगिक तत्त्वावर ४५० खोके म्हणजे १५० किलो डाळिंब विमानाने अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे रवाना करण्यात आले.
 
 


 

कृषी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा), राष्ट्रीय पीक संरक्षण संस्था (एनपीपीओ), महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर आणि आय.एन.आय फार्म प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी पणन मंडळाच्या वाशी (नवी मुंबई) येथील विकिरण सुविधा केंद्रावरुन अपेडाच्या महाव्यवस्थापक जनरल मॅनेजर विनिता सुधांशू यांनी डाळिंब प्रायोगिक तत्त्वावर पाठवण्यात आलेल्या गाडीला हिरवा झेंडा दाखविला.

भारतातून डाळिंबाच्या निर्यातीसाठी अमेरिकेचे दरवाजे उघडे झाले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील मोठी बाजारपेठ भारतीय शेतकऱ्यांसाठी खुली झाली आहेत. त्याचा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे विनिता सुधांशू यांनी सांगितले.

यावेळी मुंबई प्रादेशिक विभागाचे उपमहाव्यवस्थापक नागपाल लोहकरे, मुंबई विभागाचे प्रमुख ब्रजेश मिश्रा, कृषी पणन मंडळाचे मिलिंद जोशी, चेरमन अभिषेक देव, अपेडाच्या जनरल मॅनेजर विनिता सुधांशू , उपसंचालक ब्रिजेश मेहता, अमेरिकेच्या इन्सपेक्टर डॅग्नी वॅझेक्युझ, विकीरण सुविधा केंद्र प्रमुख सतिश वाघमोडे, निर्यातदार पंकज खंडेलवाल, डाळींब संशोधन केंद्र  सोलापूर चे डॉ. निलेश गायकवाड, डॉ. जी पी सिंग, एन.आर सीचे संचालक डॉ. मराठे, महाराष्ट्र स्टेट ॲग्रीक्लचर मार्केटीग बोर्डचे संचालक संजय कदम, आय एन आय फॉम मुंबईचे संचालक पंकज खंडेवाल आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT