Market Bulletin :कापसात सुधारणादेशातील बाजारात कापसाला सध्या चांगला उठाव मिळत आहे. चीन, बांगलादेश आणि व्हिएतनामला कापसाची आणि सुताची निर्यात वाढत आहे. सुताला उठाव मिळत असल्याने कापसालाही फायदा होत आहे. सीसीआयनेही मागील ३ दिवसांमध्ये कापसाच्या भावात वाढ केली आहे. सीसीआयच्या कापूस विक्रीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. कापसाला सध्या बाजारात ७ हजार ५०० ते ८ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. युध्दामुळे कापसाला उठाव मिळत असल्याने भावात सुधारणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .सोयाबीनमध्ये चढ उतारदेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या भावात काहिस चढ उतार सुरु आहेत. सोयाबीनची बाजारातील आवकही सरासरीपेक्षा कमी झालेली आहे. दुसरीकडे तेलाच्या भावात सुधारणा होत आहे. तर सोयापेंडलाही उठाव चांगला आहे. याचा आधार सोयाबीनच्या भावाला मिळत आहे. सध्या सोयाबीनचा भाव देशातील बाजारात ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहे. सोयाबीनची बाजारातील आवक पुढील काळात आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Sugar Export Quota: केंद्राकडून ८७ हजार टन साखर निर्यात कोटा मंजूर.कैरीला उठावराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कैरीची आवक वाढत आहे. तर वाढत्या उन्हामुळे कैरीलाही मागणी वाढत आहे. कैरीची सध्या मोठ्या बाजारांमधील आवक सरासरीपेक्षा कमीच दिसत आहे. त्यामुळे याचा आधार कैरीच्या भावाला मिळत आहे. कैरीला सध्या गुणवत्तेनुसार सरासरी ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कैरीला उठाव कायम राहण्याची शक्यता आहे. पण कैरीची बाजारातील आवक सुधारण्याचा अंदाज आहे. याचा दबाव बाजारावर राहून कैरीच्या भावावर पुढील काही दिवसांमध्ये दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे, असा व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. .Egg Price Drop: अंड्यांच्या मागणीअभावी दरात मोठी घट.कलिंगडाला मागणीवाढत्या उन्हामुळे कलिंगडाला मागणी वाढत आहे. तर राज्यातील बाजारात कलिंगडाची आवकही सुधारत आहे. रमजान महिन्याचा कलिंगडाला गेले महिनाभर चांगला आधार मिळत आहे. कलिंगडाची बाजारातील आवक सध्या सरासरीच्या तुलनेत काहिशी कमीच आहे. त्यामुळे कलिंगडाला सरासरी १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे. कलिंगडाची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये सुधारण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर आणखी काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. .तूर स्थिरावलीदेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीचा भाव स्थिरावला आहे. तुरीची आवक कमी झालेली आहे. तर यंदाही उत्पादन कमीच आहे. आयातही सध्या युध्दामुळे काहीशी प्रभावित झाली आहे. मात्र पुढील काळातही आयात होण्याची शक्यता कायम आहे. यामुळे तुरीचा भाव देशातील बाजारात स्थिरावला आहे. सध्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारातील आवक पुढील काळात काहिशी कमी होण्याची शक्यता आहे. याचा आधार तुरीच्या भावाला मिळेल, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.