Pomegranate Export : पाच वर्षांनंतर अमेरिकेत डाळिंब निर्यात सुरू

Pomegranate Production : पाच वर्षांपूर्वी अमेरिकेच्या कृषी विभागाने डाळिंब आयातीवर बंदी घातल्यानंतर निर्यातीच्या वाटा बंद झाल्याची एकंदरीत स्थिती होती; मात्र पाठपुराव्यानंतर ही निर्यात बंदी उठली.
pomegranate Market
pomegranate Market Agrowon
Published on
Updated on

Nashik News : २०१८ मध्ये डाळिंब व डाळिंब दाणे निर्यात सुरू होती. दरम्यान, डाळिंब दाण्यांमध्ये फळमाशी आढळून आल्याने अमेरिकेच्या कृषी मंत्रालयाने ही बाब गांभीर्याने घेत भारतीय डाळिंब आयातीवर निर्बंध आणले. परिणामी, गेली पाच वर्षे ही निर्यात पूर्णतः बंद होती.

ती पुन्हा सुरू करण्यासाठी भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या ‘अपेडा’ व कृषी मंत्रालयाच्या राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संस्था (एनपीपीओ) यांनी संयुक्तरित्या अमेरिकेच्या कृषी विभागाशी चर्चा करून निर्यातबंदी उठविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते.

अखेर २०२२ मध्ये बंदी उठली. त्यानंतर काही निकष व पद्धती निश्‍चित झाल्या. त्यांची पूर्तता झाल्यानंतर पाच वर्षांनंतर प्रायोगिक तत्त्वावर पुन्हा डाळिंब निर्यात सुरू झाली आहे. यामध्ये फळांवर विकिरण प्रक्रिया करण्यात आली आहे.

पाच वर्षांपूर्वी अमेरिकेच्या कृषी विभागाने डाळिंब आयातीवर बंदी घातल्यानंतर निर्यातीच्या वाटा बंद झाल्याची एकंदरीत स्थिती होती; मात्र पाठपुराव्यानंतर ही निर्यात बंदी उठली. मात्र अटी, शर्ती घालू अमेरिकेच्या कृषी मंत्रालयाने घालून दिल्या. त्यांनतर गुरुवारी (ता. २७) अपेडा, एन.पी.पी.ओ., महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आणि आय. एन. आय. फार्म यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकेमध्ये निर्यात झाली. हे कामकाज कृषी पणन मंडळाच्या आंतरराष्ट्रीय कृषी निर्यात सुविधा केंद्र येथील विकिरण सुविधा केंद्रावरून प्रायोगिक तत्त्वावर पार पडले.

pomegranate Market
Pomegranate Theft : दोन टन डाळिंबावर चोरट्यांकडून डल्ला

याप्रसंगी ‘अपेडा’चे अध्यक्ष अभिषेक देव, संचालक तरुण बजाज, कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे, ‘अपेडा’चे सरव्यवस्थापक यू. के. वत्स, पीक संरक्षण सल्लागार जे. पी. सिंग यांनी दूरदृश्‍यप्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखविला.

pomegranate Market
Pomegranate Crop Damage : गुजरातमध्ये अतिवृष्टीचा मृग बहरातील डाळिंबाला फटका

तर विकिरण सुविधा केंद्र येथे अपेडाच्या सरव्यवस्थापिका विनिता सुधांशू यांनी डाळिंब कंटेनरला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी अमेरिकेच्या निरीक्षक श्रीमती डॅग्नी वॅझेक्युझ, प्लांट क्वारंटाइन मुंबई विभागाचे प्रमुख डॉ. ब्रिजेश मिश्रा, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे डॉ. नीलेश गायकवाड, अपेडाचे उपसर सरव्यवस्थापक नागपाल लोहकरे, कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक मिलिंद जोशी, विकिरण सुविधा केंद्र प्रमुख सतीश वाघमोडे, निर्यातदार पंकज खंडेलवाल आदी उपस्थित होते.

...असे झाले निकष पाळून कामकाज

कृषी पणन मंडळाच्या वाशी (नवी मुंबई) येथील आंतरराष्ट्रीय शेतमाल सुविधा केंद्रावर डाळिंबाची प्रतवारी करून त्यावर निश्‍चित केलेल्या प्रणालीनुसार प्रक्रिया करण्यात आली. त्यामध्ये माईट वॉश, सोडियम हायपोक्लोराइड प्रक्रिया, वॉशिंग ड्राइंग आदी प्रक्रिया होती. त्यांनी निश्‍चित केलेल्या मानकानुसार ३ किलोच्या खोक्यात पॅकिंग करून डाळिंबावर विकिरण प्रक्रिया करण्यात आली आहे.

१८ जुलै रोजी विकिरण सुविधा केंद्रात अमेरिकन निरीक्षक आले होते. त्यांनी एनपीपीओ अधिकारी यांच्या समक्ष तपासणी करून मान्यतेनंतर डाळिंबावर विकिरण प्रक्रिया करण्यात आली. त्यानुसार एकूण १५० बॉक्सेसमधून ४५० किलो डाळिंब विमानातून पाठविण्यात आला आहे.

प्रायोगिक तत्त्वावर डाळिंब विमानाने अमेरिकेतील न्यू यॉर्क येथे पाठविण्यात आले. या निर्यातीनंतर अमेरिकेतील मोठी बाजारपेठ खुली होईल.
- विनिता सुधांशू, सरव्यवस्थापिका, अपेडा
यापूर्वी आंबा निर्यात प्रक्रियेत निकष पूर्ण झाले होते. तर आता डाळिंब या फळात निर्यातीचा हा पहिला टप्पा पार झाला. येणाऱ्या काळात डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्याचा फायदा होणार आहे. यासह निर्यातदारांना आवश्यक ती मदत केली जाणार आहे. अमेरिकन बाजारपेठेत भारतीय डाळिंबाचा बाजार हिस्सा वाढवण्यासाठी अपेडा, राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संस्था, राज्य कृषी पणन मंडळ, अमेरिका सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या प्राणी व वनस्पती आरोग्य तपासणी सेवा विभाग व निर्यातदार यांच्या सहकार्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.
- नागपाल लोहकरे, उपमहाव्यवस्थापक-अपेडा, मुंबई

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com