Team Agrowon
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष, देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांचा कृषी क्षेत्रातील आवडीबद्दल विशेष चर्चा होत असते.
अलीकडेच पवारांनी फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर गावचे चंद्रकांत रामचंद्र अहिरेकर यांच्या शेताला भेट दिली.
निंबाळकर यांनी २० एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या डाळींब बागेची लागवड केली आहे.
या बागेला शरद पवारांनी भेट दिली. शेताची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली.
अहिरेकर त्यांच्या शेतामध्ये भगवा जातीच्या डाळिंबाचे एकरी १० टन इतके दर्जेदार प्रतीचे उत्पादन घेतात. तसेच सुमारे ८० टक्के माल हा आखाती देशात आणि युरोपात निर्यात करतात.
त्यांनी डाळिंबाची बाग अतिशय स्वच्छ ठेवली असून फळांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी झाडांवर आच्छादनाचा वापर केला आहे.