Sugarcane Crushing Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : ऊसदर आंदोलनातही कारखान्यांनी केले २४ लाख टन ऊसगाळप

Sugarcane Production : सांगली जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी आंदोलनावर मात करत २४ लाख ९८ हजार टन उसाचे गाळप करून २३ लाख ५२ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन महिन्याचा काळ लोटला. मात्र, आंदोलनामुळे ऊस तोडणी आणि गाळपास गती नव्हती. त्यातूनही जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी आंदोलनावर मात करत २४ लाख ९८ हजार टन उसाचे गाळप करून २३ लाख ५२ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

पावसामुळे बहुतांशी साखर कारखान्यांच्या साखर उताऱ्यामध्ये घट झाल्याचे दिसत आहेत. क्रांती कारखाना गाळपात आणि साखरेच्या उत्पादनात आघाडीवर तर साखर उताऱ्यात सद्गुरु श्री श्री पिछाडीवर आहे.

जिल्‍ह्यात सहकारी आणि खासगी असे अठरा साखर कारखाने आहेत. अठरा साखर कारखान्यांनी गाळप हंगामाची तयारी सुरू केली होती. मात्र, त्यापैकी १६ साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामातील गाळप सुरू केले आहे.

कवेठमहंकाळचा महांकाली कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून यावर्षीचा गाळप हंगाम सुरू करू शकले नाहीत. त्यामुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेजारी तालुक्यातील साखर कारखान्याचा आधार घ्यावा लागत आहे.

यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे गाळप प्रारंभापासूनच कारखाना व्यवस्थापनाला आंदोलनाची झळ बसली आहे. त्यामुळे हंगाम उशिरा सुरू होतो की काय अशी अशी चर्चा सुरू होती. मात्र, त्यातूनही कारखान्यांनी गाळप सुरू केले. मात्र, त्यानंतर पावसाने हजेरी लावली.

त्यामुळे कारखान्यांना ऊस तोडणीचे वेळापत्रक थांबवावे लागले होते. हंगाम सुरू झाल्यापासून गाळपास फारशी गती नव्हती. त्यातच पुन्हा शेतकरी संघटनेने ऊस दरासाठी आंदोलन सुरू केले. साखर कारखान्यांनी आंदोलनावर मात करत गाळप यशस्वी सुरू केले असल्याचे चित्र आहे.

क्रांती कारखान्याने ३ लाख ४ हजार टन उसाचे गाळप करत २ लाख ४४ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेऊन उत्पादनात अग्रेसर आहे. तर भारती शुगर म्हणजे यशवंत शुगरने २३ हजार टन गाळप करत १९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. भारती शुगरने सर्वांत कमी गाळप केले असून साखरेचे उत्पादनही कमीच आहे.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी केलेले गाळप

कारखाना गाळप (टन उत्पादन (क्विंटल) उतारा टक्के

श्री दत्त इंडिया १ लाख ६३ हजार १ लाख ५० हजार ९.१९

राजारामबापू पाटील (साखराळे) २ लाख २५ हजार २ लाख २३ ९.९२

विश्वासराव नाईक १ लाख ७१ हजार १ लाख ८२ हजार १०.६३

हुतात्मा (वाळवा १ लाख ३९ हजार १ लाख ५० हजार १०.८४

राजारामबापू पाटील (वाटेगाव १ लाख ५९ हजार १ लाख ७७ हजार ११.१४

राजारामबापू पाटील (जत) ८१ हजार ८० हजार ९.७७

सोनहिरा (वांगी) २ लाख ७८ हजार २ लाख २२ हजार ७.९९

क्रांतिअग्रणी (कुंडल) ३ लाख ४ हजार २ लाख ४४ लाख ८.०३

राजारामबापू पाटील (सर्वोदय) १ लाख ११ हजार १ लाख २३ हजार ११.१४

मोहनराव शिंदे ८६ हजार ८१ हजार ९.४७

दालमिया (निनाईदेवी) १ लाख २५ हजार १ लाख ३७ हजार १०.९६

भारती शुगर (यशवंत शुगर) २३ हजार १९ हजार ८.११

केन ॲग्रो १ लाख १९ हजार १ लाख ५ हजार ८.८९

उदगिरी शुगर १ लाख ८८ हजार १ लाख ७७ हजार ९.३९

सदगुरु श्री श्री २ लाख २ हजार १ लाख ५२ हजार ७.५३

श्रीपती शुगर १ लाख २३ हजार १ लाख २८ हजार १०.४५

एकूण २४ लाख ९८ हजार २३ लाख ५२ हजार ९.४२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT