Kolhapur News : देशात यंदा साखर हंगामाची सुरुवात संथ झाली आहे. यंदा ऑक्टोबरमध्ये गळीत हंगामाची सुरुवात झाली आहे. १५ नोव्हेंबरअखेर देशभरात २६३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. गत वर्षी या तारखेपर्यंत ३१७ कारखाने सुरू झाले होते. ऊसगाळप १६२ लाख टन झाले आहे. ते गतवर्षीच्या तुलनेत ८४ लाख टनांनी कमी आहे. या कालावधीत १२.७५ लाख टन साखरनिर्मिती झाली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत २० लाख टन लाख साखर तयार झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ७.२५ लाख टनांनी साखर उत्पादनही घटले आहे.
यंदा उत्तर प्रदेशातील साखर कारखाने पहिल्यांदाच ऑक्टोबर महिन्यात सुरू झाले. मात्र कर्नाटक आणि महाराष्ट्रातील साखर हंगाम १ नोव्हेंबरनंतर सुरू झाला. त्यातच पश्चिम महाराष्ट्रातील ऊसदर आंदोलनामुळे हंगाम उद्घाटनाची विधिवत सुरुवात होऊनदेखील कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. याचा फटका ऊसगाळपावर झाला आहे.
गेल्या वर्षी साखर हंगामात साखरेचे निव्वळ उत्पादन ३३९ लाख टन झाले होते. त्या व्यतिरिक्त ४३ लाख टन साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी झाला होता. मात्र यंदा ४० लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वळविल्यानंतर साखरेचे उत्पादन २९१ लाख टन इतकेच होण्याचा केंद्र शासनाचा अंदाज आहे. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे वातावरण बदल झाला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीचे ऊसगाळप व साखर उत्पादन गत वर्षीच्या तुलनेत कमी राहणार असल्याचे महासंघाने म्हटले आहे.
केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या नव्या राष्ट्रीय सहकारी निर्यात संस्थेमार्फत नेपाळ आणि भूतानला ५० हजार टन साखरेच्या निर्यातीचा निर्णय झाला आहे. ही निर्यात पूर्णपणे सहकारी साखर कारखान्यांच्या साखरेची होणार असल्याचे राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या सूत्रांनी सांगितले.
राज्यात हंगामास प्रारंभ होऊन १५ दिवसांचा कालावधी उलटला आहे. राज्यातील केवळ १०३ कारखाने सुरू झाले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत १४१ कारखाने सुरू झाले होते. यंदा केवळ २ लाख टन साखर तयार झाली आहे. गेल्या वर्षी ती ८ लाख टन तयार झाली होती. यावरूनच राज्यातील यंदाच्या हंगामाची गती स्पष्ट होते.
उत्तर प्रदेश...७५...७६...३९...४६...३.४०...३.६०
महाराष्ट्र...१०३...१४१...३६...१०१...२.४०...८.६०
कर्नाटक...५०...६२...५३...७६...४.३०...६.१०
गुजरात...१३...१४...११...७...०.८०...०.६०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.