Sugarcane Shortage : शेतकऱ्यांची घाई; टोळ्यांची वरकमाई

Sugarcane Factory Update : ऊसटंचाई असल्याने कारखान्यांना उसाची गरज असताना शेतकऱ्यांच्या घाई वाढत आहे. यासह क्रमपाळीने येणाऱ्या तोडीमध्येही टोळ्यांची वरकमाई जोरात सुरू झाली
Sugarcane
SugarcaneAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : ऊसटंचाई असल्याने कारखान्यांना उसाची गरज असताना शेतकऱ्यांच्या घाई वाढत आहे. यासह क्रमपाळीने येणाऱ्या तोडीमध्येही टोळ्यांची वरकमाई जोरात सुरू झाली आहे. टोळीप्रमुख दिवसाला टनामागचा दर वाढवत आहे, तर वाहनचालकाची एंट्रीही गगनाला भिडली आहे.

उत्पादकांच्या या खिसेमारीवर कारखानदार लक्ष देणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे यंदाचा गळीत हंगाम उशीरा सुरू झाला आहे. आतापर्यंत तालुक्याच्या शेजारील कारखान्यांनी एक ते तीन लाख टनापर्यंतचे गाऴप पूर्ण केले आहे.

Sugarcane
Sugarcane Variety : उसाची नवीन जात : फुले ऊस १३००७

तालुक्यात दहाहून अधिक वेगवेगळ्या कारखान्यांच्या साधारण ४५० ते ५०० टोळ्या कार्यरत आहेत. परंतु यावर्षी कारखानदारांना उसाची कमतरता भासणार आहे. तरीसुद्धा टोळ्यांची मनमानी आतापासूनच सुरू झाली आहे. शेतकऱ्यांची ऊस पाठवण्याची घाईसुद्धा त्याला कारणीभूत ठरत आहे. शेतातील ऊस कधी एकदा जाईल, या मानसिकतेमुळे टोळ्यांचे फावत आहे.

आठवड्यापूर्वी प्रतिटनाला शंभर रुपये असणारा दर आता दोनशेपर्यंत पोहोचला आहे. वाहनचालकाची एंट्री ३०० वरून ४०० रूपयापर्यंत गेली आहे. ऊस पाठवण्यासाठी शेतकऱ्यांची घाई असल्याने टोळींना आयते कुरण उपलब्ध झाले आहे.

Sugarcane
Sugarcane Management : अवर्षण परिस्थितीत उसाचे व्यवस्थापन

एवढेच नव्हे, तर क्रमपाळीनुसार येणाऱ्या तोडीलाही टोळ्या पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या प्रकाराकडे कारखानदारांची डोळेझाकही संताप आणणारी ठरत आहे. मुळात टोळ्यांसह वाहनधारकांनाच ओढणी खर्च कारखान्यांकडून मिळत असूनही या वरकमाईने शेतकऱ्यांची लूट सुरू झाली आहे.

कोट्यवधींचा दरोडाच

तालुक्यात दरवर्षी सरासरी ७ ते ८ लाख टनापर्यंत उसाचे उत्पादन होते. उत्पादनात घट असल्याने यंदा ६ लाख टनापर्यंत ऊस गळीताला जाईल अशी शक्यता आहे. प्रतिटन २०० रुपयांप्रमाणे टोळ्यांची ही वरकमाई गृहीत धरली तरी १२ कोटींपर्यंत जात आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात या वरकमाईत आणखी वाढ होते. यामुळे साधारण १५ कोटींवर ही लूट पोहोचण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांच्या खिशावर उघडपणे टाकलेला हा दरोडाच म्हणावा लागेल. घाईच्या शेतकऱ्याकडून वरकमाई एकवेळ मान्य करता येईल, परंतु क्रमपाळीनुसार तोड आलेल्या शेतकऱ्याच्या उसालाही कोयता लावताना टोळ्यांनी पैसे वसूल केल्याच्या तक्रारी आहेत. त्यावरही कारखान्यांकडून कारवाई नसल्याने शेतकऱ्यांतून संताप आहे.

ऊस तोडीचे आजचे दर

तालुक्यात कार्यरत टोळ्या ४५० ते ५००

प्रति टन १७० ते २०० रुपये

वाहनाची एंट्री फी ३५० ते ४०० रुपये

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com