Dr. Indra Mani Agrowon
ॲग्रो विशेष

Water Management : सिंचनासाठी पाण्याच्या काटेकोर व्यवस्थापनावर भर द्यावा

Dr. Indra Mani : संरक्षित पाणीसाठ्यासाठी शेततळ्यांची संख्या वाढवून पाण्याचे स्रोत वाढवावे लागतील, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.

Team Agrowon

Parbhani News : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सातत्याने दुष्काळाला सामोरे जावे लागते. भूजल पातळी अतिशय खालावली आहे. या परिस्थितीत काटेकोर पाणी व्यवस्थापन तसेच वितरणांवर भर द्यावा लागेल. सिंचनासाठी प्राधान्याने ठिबक, तुषार यासारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करावा लागेल.

पाणी वापराबाबत अतिशय संवेदनशील राहावे लागले. संरक्षित पाणीसाठ्यासाठी शेततळ्यांची संख्या वाढवून पाण्याचे स्रोत वाढवावे लागतील, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात शिक्षण संचालनालयाद्वारे शुक्रवारी (ता. २२) जागतिक जल दिन साजरा करण्यात आला.

या वेळी कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी दूरदृश्‍य प्रणालीद्वारे उपस्थित बोलत होते. शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे, डॉ. संजीव बंटेवाड, विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम, डॉ. पी. एस. नेहरकर, डॉ. दिगंबर पेरके, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पी. आर. झंवर आदींची उपस्थिती होती.

संशोधन संचालक डॉ. जगदीश जहागीरदार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. भगवान असेवार, डॉ. राकेश अहिरे हे आभासी माध्यमाद्वारे सहभागी झाले होते. डॉ. इंद्र मणी म्हणाले, की या वर्षीच्या जागतिक जल दिनाच्या निमित्ताने ‘शांततेसाठी जल’ ही संकल्पना आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवला पाहिजे. डॉ. खोडके म्हणाले, की सजीव-निर्जीव वस्तूसाठी पाण्याची गरज असते.

वाहून जाणारे पाणी थांबविले पाहिजे याबरोबरच पाण्याचा वापर बहुविध प्रकारे, पूर्ण क्षमतेने करावा, उपलब्ध जमिनीपैकी किमान १५ टक्के जमीन जलसाठा करण्यासाठी उपयोगात आणावी.

पिकासाठी वापरात येणारे पाणी १० टक्के वाचले, तर इतर क्षेत्रासाठी त्याचा ४० टक्के वाटा मिळतो. विद्यापीठाने कमी पाण्यावर येणारे अनेक वाण तसेच पाण्याची बचत होणाऱ्या लागवड पद्धती विकसित केलेल्या आहेत. या सर्व शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्याचा पूर्ण क्षमतेने वापर होणे आवश्यक आहे. सूत्रसंचालन डॉ. धीरज पाथ्रीकर यांनी तर आभार डॉ. गणपत कोटे यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT