Agriculture Technology : शेती उद्योगाच्या यशस्वितेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी

Sunil Dhikle : आधुनिक शेती व शेतीपूरक उद्योगांची कास धरणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांनी केले.
Sunil Dhikle
Sunil DhikleAgrowon
Published on
Updated on

Nashik News : तरुणांनी योग्य अभ्यास करून शेतीत बदल घडविणे गरजेचे आहे. शेती व्यवसायात उत्पादन वाढीसाठी तरुणांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतीला नवसंजीवनी प्राप्त द्यावी. त्यासाठी आधुनिक शेती व शेतीपूरक उद्योगांची कास धरणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांनी केले.

राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर शांतारामबापू कोंडाजी वावरे सिडको, महाविद्यालय व कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालय पिंपळगांव (ब.) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचदिवसीय राज्यस्तरीय शिबिर समारोप प्रसंगी ते बोलत होते.

Sunil Dhikle
Agriculture University : ‘चार जिल्ह्यांसाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठाची आवश्‍यकता’

यावेळी व्यासपीठावर मविप्र उपसभापती देवराम मोगल, मविप्र संचालक शिवाजीराव गडाख, सिडको महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. कुशारे, महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, रासोये जिल्हा समन्वयक डॉ. रवींद्र आहिरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी श्रीमती वर्षा शिरोरे, प्रा. एस. टी. घुले,

Sunil Dhikle
Forest Fire : वणव्यात आंबा, काजूसह हजारहून अधिक झाडे जळाली

उपप्राचार्य प्रा. दिलीप माळोदे, प्रा. शुभम गव्हाणे, प्रा. भगवान कडलग, प्रा. संपत खैरनार आदी उपस्थित होते.डॉ. ढिकले म्हणाले, की शेती नापिकी होऊ नये म्हणून शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर सिंचन क्षमता तपासून पीक पद्धती ठरविणे ही काळाची गरज आहे.शिबिरात ८ विद्यापीठातील एकूण १२५ विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. टी. घुले यांनी केले तर प्र. प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com