Tur Crop : तुरी सारख्या पिकाला शेतकऱ्यांनी प्राधान्य देणे गरजेचे ः कुलगुरू इंद्र मणी

Indra Mani : कमी लागवड खर्च आणि अधिक उत्पादन याचा विचार करता तुरी सारख्या पिकाला शेतकऱ्यांनी प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू इंद्र मणी यांनी व्यक्त केले.
Tur Crop
Tur CropAgrowon
Published on
Updated on

Jalna News : कमी लागवड खर्च आणि अधिक उत्पादन याचा विचार करता तुरी सारख्या पिकाला शेतकऱ्यांनी प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू इंद्र मणी यांनी व्यक्त केले. अशाच पद्धतीने नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकऱ्यांमध्ये होण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कुलगुरू इंद्र मणी यांनी कृषी संशोधन केंद्र बदनापूर येथील शास्त्रज्ञांच्या समवेत गोदावरी वाणाची लागवड केलेल्या शेतकऱ्याच्या शेतावरती शुक्रवारी (ता. २४) भेट दिली. सध्या कंडारी ता. बदनापूर २०० एकर क्षेत्रावर गोदावरी वाणाची लागवड करण्यात आल्याची माहिती शेतकरी राजेंद्र शिंगारे यांनी दिली. श्री. शिंनगारे यांनी २०२० मध्ये एक किलो गोदावरी वाणाचे बियाणे कृषी संशोधन केंद्र बदनापूर येथून आणले.

Tur Crop
Tur Crop Condition : खानदेशात कोरडवाहू तूर स्थिती बनतेय बिकट

त्यांनी गेल्या तीन वर्षांमध्ये आपल्याकडील बियाणे इतर शेतकऱ्यांना दिले. दोन वर्षांमध्ये गोदावरी वाणाची १८ क्विंटलपर्यंत प्रति एकरी उत्पादन शेतकऱ्यांना मिळाल्याचे राजेंद्र शिंगारे यांनी सांगितले. बद्रीनाथ फटाले, कंडारी यांनी २५ मे रोजी गोदावरी वाणाची लागवड केली.

Tur Crop
Tur Crop : पाण्याअभावी कोरडवाहू तूर धोक्यात

कृषी संशोधन केंद्र बदनापूरद्वारे विकसित केलेले वाण बीडीएन २, बीडीएन ७११ आणि नव्याने प्रसारित केलेली गोदावरी केवळ राज्यपातळीवर नव्हे तर देशपातळीवर शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत. याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना कुलगुरू डॉ इंद्र मणी यांनी दिली.

यांची लागवड महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात सारख्या राज्यांमध्ये सुद्धा होत असल्याचे दिसून येत‌ असल्याचेही कुलगुरू यांनी विशेष नमूद केले. यावेळी कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. के. टी. जाधव, डॉ. डी. के. पाटील, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा व प्राचार्य डॉ. आर. डी. अहिरे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सचिन सोमवंशी, डॉ. पी. ए. पगार आणि इतर शास्त्रज्ञ उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com