Dr. Shrirang Kadrekar  Agrowon
ॲग्रो विशेष

Hapus Mango : हापूसचा आंतरराष्ट्रीय दर्जा टिकविण्यासाठी प्रयत्न आवश्यक

Dr. Shrirang Kadrekar :कोकणची ओळख असलेल्या हापूस आंब्याचा आतंरराष्ट्रीय बाजारपेठेत कायमस्वरूपी दर्जा टिकवून ठेवण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न आवश्यक असल्याचे मत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Sindhudurg News : कोकणची ओळख असलेल्या हापूस आंब्याचा आतंरराष्ट्रीय बाजारपेठेत कायमस्वरूपी दर्जा टिकवून ठेवण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न आवश्यक असल्याचे मत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी व्यक्त केले.

देवगड तालुक्यातील पडेल येथे यंदाचा हापूस हंगाम, आंबा पिकाला होत असलेला विविध कीडरोगांचा प्रादुर्भाव, त्यावरील उपाय, उत्पादन वाढीसाठी उपाययोजना आणि बाजारपेठ आदी विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. अजित शिरोडकर, आंबा बागायतदार जर्नादन तेली, उमेश लांजेकर, चेतन प्रभू, आदेश बर्डे, डॉ. समीर नवरे, योगेश जोशी, विद्याधर जोशी आदी उपस्थित होते.

डॉ. कद्रेकर म्हणाले, की हापूस ही कोकणची ओळख बनलेली आहे. राष्ट्रीय, आतंरराष्ट्रीय बाजारपेठेत हापूसला मोठे स्थान आहे. हापूसचे आतंरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थान टिकविण्यासाठी सामूहिकपणे प्रयत्न होणे आवश्यक आहेत. आंबा बागायतदारांचे अनेक प्रश्न आहेत.

हे प्रश्न सोडविण्यासाठी बागायतदारांनी सतत एकमेकांशी चर्चा केली पाहीजे. एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण केली पाहीजे, चर्चा घडवून आणली पाहीजे. त्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग केला पाहीजे. गरज भासल्यास शासन, कृषी विद्यापीठाकडे पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे श्री. कद्रेकर यांनी स्पष्ट केले.

डॉ. शिरोडकर म्हणाले, की बागायतदांरानी व्यवसायात नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहीजे. आंबा पिकांच्या वाढीसाठी माती, पाने, फळे याचे सतत निरीक्षण, परीक्षण करणे आवश्यक आहे. पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्ये दिली पाहिजेत. काळानुरूप काय बदल केले पाहिजेत याचा विचारदेखील केला पाहिजे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT