Hapus Mango Pest : हापूस आंब्यावरील फूलकिडींत प्रतिकारक्षमता वाढतेय

Mango Pest Management : कोकण कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या अध्यक्षतेखाली दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या झालेल्या बैठकीत फूलकिडीवरील नियंत्रणाविषयी चर्चा झाली.
Mango Pest
Mango Pest Agrowon
Published on
Updated on

Ratnagiri News : जिल्ह्यात हापूस आंब्यावर फूलकिडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यांच्यामध्ये कीटकनाशकांप्रती प्रतिकारक्षमता वाढली आहे. त्यामुळे कीटकनाशकांचा किडींवर अपेक्षित परिणाम होत नाही, असा प्राथमिक अंदाज कोकण कृषी विद्यापिठाच्या संशोधकांनी अभ्यासाअंती काढला आहे.

फूलकिडी नियंत्रणासाठी गोळप व कळंबट येथील एक एकर बागेत प्रयोग सुरू असल्याचे कोकण कृषी विद्यापिठाचे संशोधक डॉ. व्ही. एन. जालगावकर यांनी सांगितले. कोकण कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या अध्यक्षतेखाली दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या झालेल्या बैठकीत फूलकिडीवरील नियंत्रणाविषयी चर्चा झाली. त्यानंतर विद्यापीठाने संशोधनाला सुरुवात केली आहे.

Mango Pest
Mango Pest : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंब्यांवर फुलकिडीचा मोठा प्रादुर्भाव

आंबा पिकावर पिवळ्या व काळ्या अशा दोन प्रकारच्या फूलकिडींच्या प्रजाती दिसत आहेत. त्यामध्ये आनुवंशिक बदल झाला आहे का, यावर विद्यापीठामार्फत संशोधन चालू आहे. बाजारात आंब्यावरील फूलकिडीसाठी कोणतेही प्रभावी लेबल क्लेम कीटकनाशक नाही.

त्यामुळे कृषी विद्यापीठ व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने फूलकिडींच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील कळंबट (दापोली) व गोळप (रत्नागिरी) तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा (मालवण) व फणसे (देवगड) येथे अन्य पिकांवर फुलकिडींसाठी प्रभावी कीटकनाशके वापरून प्रायोगिक प्रक्षेत्र चाचणी प्रात्यक्षिके सुरू केली आहेत.

या हंगामअखेर त्याचे निष्कर्ष उपलब्ध होतील. गोळप येथील प्रक्षेत्रात चाचणी प्रयोग प्रात्यक्षिकांमध्ये वापरण्यात आलेल्या कीटकनाशकांचे आशादायक निष्कर्ष प्राथमिक स्वरूपात दिसून येत असून फूलकिडीचा फळावरील प्रादुर्भाव कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. प्रात्यक्षिक पूर्ण झाल्यावर याबाबत सविस्तर निष्कर्ष पुढे येतील.

Mango Pest
Mango Pest : फुलकिडीने नुकसान झालेल्या आंबा बागांचे सर्व्हेक्षण करा

हापूस आंबा बागेत फूलकिडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. ही अतिशय सूक्ष्म कीड असून, किडीचा व पिलांचा रंग पिवळसर अथवा काळा असतो. मादी कोवळ्या पानांच्या शिरांमध्ये अंडी घालते. पिले व पूर्ण अवस्थेतील फूलकिडे पानाची साल खरवडतात आणि पानातील रस शोषतात. पानाच्या कडा तसेच शेंडे करपतात व पाने वेडीवाकडी झालेली दिसतात. मोहोरावर देखील या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. फळांवर प्रादुर्भाव झाल्यास फळांची साल खरवडल्यामुळे काळपट तांबूस किंवा विटकरी रंगाची होते.

ही कीड सूक्ष्म असल्यामुळे आंबा बागायतदारांनी आंबा मोहोर व फळांचे काळजीपूर्वक सर्वेक्षण करून किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे का, याची पाहणी करून वेळीच उपायोजना कराव्यात. ज्या शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार व एकाच कीटकनाशकाचा फवारणी केली, त्या बागेस प्रादुर्भाव कमी प्रमाणात व नियंत्रणात आहेत. कीटकांमध्ये जनुकीय बदल झाल्याची शक्यता तपासली जात आहे.

कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ व कृषी विभागातील अधिकारी यांच्यामार्फत शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन तसेच फूलकिडींच्या व्यवस्थापनासाठी शेतकरी मेळावे चर्चासत्रे आयोजित करून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच फूलकिडीच्या नियंत्रणासाठी शास्त्रीय पद्धतीने विविध कीटकनाशकांचा अभ्यास विद्यापीठामार्फत सरू करण्यात आला आहे.

किडींचे व्यवस्थापन असे करा...

या किडींच्या व्यवस्थापनाकरिता विद्यापीठामाफत स्पिनोसॅड (४५ टक्के प्रवाही) २.५ मिली किंवा थायामेथोक्झाम (२५ टक्के) २ ग्रॅम प्रति १० लीटर पाणी या प्रमाणात फवारणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. ( या कीटकनाशकांना लेबल क्लेम नाहीत). परंतु सद्यःपरिस्थिती बाजारात उपलब्ध असलेले कुठलेही कीटकनाशक फूलकिडीच्या नियंत्रणासाठी प्रभावी नाही, असे विद्यापिठाकडून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com