Fruit Crop Management Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Management : जास्त थंडीचा फळबागेवर होणारा परिणाम

Fruit Crop : हिवाळ्यात कमी होणार तापमान हे विविध फळबागेसाठी नुकसानकारक ठरत. कडाक्याच्या थंडीमुळे पाने करपतात. फळांना भेगा पडतात. फळे काळी पडतात.

Team Agrowon

Cold Season : हिवाळ्यात कमी होणार तापमान हे विविध फळबागेसाठी नुकसानकारक ठरत. कडाक्याच्या थंडीमुळे पाने करपतात. फळांना भेगा पडतात. फळे काळी पडतात.

राज्यात हिवाळ्यातील तापमान हे बऱ्याचवेळा १६ अंश सेल्सिअसपेक्षा कमी होतं. अशा कमी तापमानाचा फळझाडांच्या वाढीवर परिणाम होतो. विविध फळपिकांची कमाल व किमान आणि सरासरी तापमान यांची मर्यादा वेगवेगळी असते. 

जास्त थंडाचा फळबागेवर होणारा परिणाम

ज्या वेळी तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असतं, तेव्हा उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातील फळझाडांची कार्यशक्ती कमी होते. त्यापेक्षाही तापमान कमी झाले तर झाडांच्या पानांना इजा होऊन ती करपतात. फळांना भेगा पडतात. फळे काळी पडतात. यामध्ये केळी, द्राक्ष आणि पपई या पिकांच कडाक्याच्या थंडीमुळे जास्त नुकसान होण्याची शक्यता असते. तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्यास कोणत्या उपाययोजना कराव्यात याविषय़ी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.  

प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत?

फळबागेच्या पश्चिम व दक्षिण दिशेला शेवरी, हादगा, पांगरा, तुती व बांबू या सारख्या प्रतिबंधक झाडांची लागवड करावी. झाडांची लागवड जर केली नसेल तर शेडनेट किंवा कापड लावावे. 

बागेत थंड वाऱ्यापासून संरक्षण होण्यासाठी बागेभोवती सजीव कुंपण म्हणून दोन ओळीत शेवरी, गजराज गवत, एरंड, गिरिपुष्प किंवा सुरुची दाट लागवड करावी. बागेची छाटणी करावी. फळझाडे लहान असताना रबी हंगामात मोकळ्या व रांगेतील उघड्या जमिनीच्या पट्ट्यावर दाट पसरणारी पिके घ्यावीत.  

नियंत्रणाचे उपाय

थंडीच्या प्रमाणाचा अंदाज घेण्यासाठी हवामान खात्यांच्या पूर्वसूचनांकडे लक्ष ठेवावं. अशा पूर्वसूचना मिळताच फळबागेमध्ये शक्यतो रात्री किंवा पहाटे ठिबक सिंचनाने पाणीपुरवठा करावा. असे पाणी दिल्याने बागेतील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. विहिरीच्या पाण्याचे तापमान हे कालव्यापेक्षा थोडे जास्त असते, याचा फायदा होतो.

झाडाच्या खोडापाशी व आळ्यात वाळलेले गवत, पालापाचोळा, उसाचे पाचट, गव्हाचा भुसा अशा सेंद्रिय पदार्थांच आच्छादन करावं. त्यामुळे मुळांच्या परिसरातील तापमान नियंत्रित राहू शकेल. अत्यंत कमी झालेल्या तापमानाचा झाडांच्या मुळ्यांवर व कार्यक्षमतेवर परिणाम होणार नाही.

केळी बागांमध्ये प्रत्येक झाडास खोडालगत एक किलो निंबोळी पेंड द्यावी. यामुळे अन्नद्रव्ये मिळण्यासोबतच पेंड कुजतेवेळी निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे बागेतील तापमान सुधारतं. याशिवाय सूत्रकृमींचाही बंदोबस्त होतो.

थंडीचे प्रमाण कमी होईल, तोवर फळबागांमध्ये फक्त रोगग्रस्त फांद्याच कापाव्यात. फळबागांची अतिरिक्त छाटणी करू नये. यामुळे फळबागेची थंडीपासून हानी होणार नाही.

रोपवाटिकेतील रोपे, कलमे, बियाण्याचे वाफे यावर तण, वाळलेले गवत, तुराट्याचे खोपट किंवा तट्टे याचे छप्पर उभारावे. असे खोपट छप्पर सायंकाळी ६ वाजता घालावे व सकाळी सूर्यप्रकाश पडल्यावर काढून घ्यावे. छप्पर करण्यासाठी शक्यतो काळ्या पॉलिथीनचाही वापर करता येतो. 

रात्रीच्या वेळी फळबागेत जागोजागी पालापाचोळा किंवा काडीकचरा जाळून धूर करावा. नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा. पालाशयुक्त खते जसं म्युरेट ऑफ पोटॅश किंवा लाकडी कोळशाची राख खत म्हणून दिल्यास झाडाची पाणी व अन्नद्रव्ये शोषणाची व वहनाची क्षमता वाढते. नवीन लागवडीसाठी फळझाडांच्या थंडीला प्रतिकारक जाती वापराव्यात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT