Buffalo Management : जास्त तापमानाचा म्हशींवर काय परिणाम होतो?

Team Agrowon

साधारणपणे म्हशीच्या रेडीची पहिली गर्भधारणा होईपर्यंत ३ उन्हाळ्याचा कालावधी जात असल्याने वातावरणातील काही घटक यामध्ये तापमान,हवेचा वेग आणि दिशा,आर्द्रतेचा म्हशीच्या आरोग्यावर अपायकारक परिणाम होतो.

Buffalo Management | Agrowon

म्हशीचा रंग काळा आणि घाम ग्रंथी कमी असल्यामुळे शरीरातील उष्णता उत्सर्जित करताना अडचणी येतात. म्हशी शारीरिक तापमान स्वनियंत्रीत करू शकत नाहीत आणि त्यामुळेच, म्हशींना उष्णतेचा ताण किंवा त्रास होत असतो.

Buffalo Management | Agrowon

उष्णतेच्या ताणामुळे रेडीचे ऋतुचक्र विस्कळते आणि त्या उन्हाळ्यात माजावर येत नाहीत. त्यामुळेच,उन्हाळ्यातील काळ व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. 

Buffalo Management | Agrowon


सुरवातीपासूनच रेडीचे योग्य व्यवस्थापन असल्यास प्रजोत्पादनक्रिया लवकर कार्यान्वित होते.

Buffalo Management | Agrowon

साधारणपणे पहिले वेत वयाच्या चौथ्या वर्षी होऊ शकते.काही कारणांनी रेडीचे पहिले वेत उशिरा होत असल्यास दैनंदिन व्यवस्थापन खर्चात नाहक वाढ होते.

Buffalo Management | Agrowon

उन्हाळ्यात कमी प्रमाणात हिरवा चारा,खाद्य आणि योग्य निवारा व्यवस्था नसल्यामुळे रेडीची शारीरिक वाढ खुंटते प्रजोत्पादनक्रिया काहीशा प्रमाणात विस्कळल्याने भविष्यात मिळणाऱ्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असते. 

Buffalo Management | Agrowon
Animal Care | Agrowon