Profitable Farming Crops: खानदेशात यंदा पपई लागवडीत मोठी वाढ दिसत आहे. लागवड सुरूच असून, यंदाचे क्षेत्र १४ ते १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज आहे. .पपईची लागवड मागील हंगामात खानदेशात १२ हजार हेक्टरवर झाली होती. एकट्या नंदुरबार जिल्ह्यातील लागवड सुमारे सात हजार हेक्टरवर होती. एकट्या शहादा (जि. नंदुरबार) तालुक्यातील लागवड पाच हजार हेक्टरवर झाली होती. यंदा जळगाव, धुळे जिल्ह्यांत पपईची लागवड वाढली आहे. .Khandesh Papaya Cultivation: खानदेशात पपई लागवडीत वाढ.जळगावात यंदा सुमारे तीन हजार हेक्टरवर पपईची लागवड झाल्याचा अंदाज आहे. तर धुळ्यात सुमारे २२०० हेक्टरवर पपई पीक आहे. तर नंदुरबारात सुमारे आठ ते साडेआठ हजार हेक्टरवर पपईची लागवड होईल, असा अंदाज आहे. नंदुरबारात लागवड या महिन्यात सुरू झाली आहे. जळगाव, धुळ्यातील लागवडही सुरूच आहे..Papaya Cultivation: अर्ली पपई लागवड खानदेशात पूर्ण.विविध वाणांना पसंतीलागवडीसाठी १५ नंबर, ७८६, २१ नंबर आदी वाणांना प्राधान्य शेतकऱ्यांनी दिले आहे. काही शेतकऱ्यांनी सुधारित व संशोधित पपई वाणांची लागवड केली आहे. नंदुरबारात पपईखालील क्षेत्र अत्यल्प किंवा किंचीत कमी होईल. परंतु लागवड जळगावात अधिक आहे. जळगावात यंदा चोपडा, जामनेर, यावल, रावेर, जळगाव या भागात पपईची लागवड वाढली आहे..धुळ्यात धुळे, शिंदखेडा व शिरपूर भागात पपई पीक आहे. धुळ्यातील लागवडीत किंचित वाढ झाली आहे. अनेकांनी कापूस लागवड टाळून पपईला पसंती दिली आहे. लागवड मे अखेरपर्यंत सुरू राहील. उष्णता अधिक असल्याने अनेक शेतकरी पपईला क्रॉप कव्हर लावत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.